Tuesday, October 14, 2025

Stock Market Closing: अखेरच्या सत्रात पुनश्च हरिओम! घसरणीसह बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात 'सेल ऑफ'

Stock Market Closing: अखेरच्या सत्रात पुनश्च हरिओम! घसरणीसह बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात 'सेल ऑफ'

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात मात्र घसरण झाली आहे. सकाळच्या वाढीनंतर शेअर बाजारातील वाढत्या सेल ऑफ मुळे ही घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः आज मोठ्या प्रमाणात सेक्टोरल निर्देशांकात श्रेत्रीय वि शे ष प्रतिसादा अंतर्गत मोठे सेल ऑफ झाले आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २९७.०७ अंकांने घसरत ८२०२९.९८ पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ८१.८५ अंकांने घसरत २५१४५.५० अंकाने स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात अखेर च्या सत्रात सेल ऑफ वाढल्याने घसरण झाली आहे.लार्जकॅप तुलनेत मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये आज अधिक घसरण झाली. मजबूत फंडामेंटलमुळे आज बाजारातील घसरण मर्यादित पातळीवर राहिली असली तरी निश्चितच अपेक्षित यश आज बाजारात मिळू शकले नाही.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात एकही निर्देशांकात वाढ झाली नसून सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (१.५२%), रिअल्टी (०.९४%), मेटल (०.९९%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.०८%), मिडिया (१.०३%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरू वातीच्या कलात आज एस अँड पी ५०० (१.५६%), नासडाक कंपोझिट (२.२१%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर डाऊ जोन्स (०.५५%) मध्ये आज घसरण झाली आहे. कमोडिटी बाजारात आजही दबाव कायम राहिल्याने सोने व चांदीत दुपारपर्यंत वाढ झाली हो ती. रूपयांच्या तुलनेत डॉलर उसळल्याने त्याचाही फटका बाजारातील मूडमध्ये बसला आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारात सेल ऑफ झाले.

आजच्या अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सीई इन्फोसिस्टिम (८.९७%), आनंद राठी वेल्थ (७.७८%), एमसीएक्स (५.१३%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (४.२३%), टाटा कम्युनिकेशन (४.१४%), बिकाजी फूडस (३%), एजंल वन (२.७३%), वारी एनर्जीज (२.३५ %), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (१.८७%), ३६० वन (२.३०%), केपीआर मिल्स (१.९५%), एल टी फूडस (१.७७%), सम्मान कॅपिटल (१.४७%), गोदरेज इंडस्ट्रीज (१.३७%), स्विगी (१.२३%), टेक महिंद्रा (१.१८%), आयसीआयसीआय लोंबार्ड (१.१७%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टाटा मोटर्स (४०.१५%), लीला पॅलेस (५.६८%), दीपक फर्टिलायजर (४.५९%), वोडाफोन आयडिया (४.२४%), आयटीआय (३.७७%), सिग्नेचर ग्लोबल (३.६९%), बंधन बँक (३.५०%), युको (३.१८%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३. २६%), हिन्दुस्तान कॉपर (३.१२%), युको बँक (३.१८%), आयएमसीआय (३.०९%), एनबीसीसी (३.०५%), अतुल (२.९९%), सीएट (२.९५%), येस बँक (२.९५%), अलेंबिक फार्मा (२.९५%), झेंसार टेक्नॉलॉजी (२.८५%), रेडिको खैतान (२.८४%), सारडा एन र्जी (२.८१%), पिरामल फार्मा (२.६९%), जे एम फायनांशियल (२.६१%), टीबीओ टेक (२.५३%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (२.५२%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' सलग तीन सत्रांच्या तेजीनंतर, मंगळवारी भारतीय शेअर बाजारांना नफा बुकिंगचा फटका बसला, ज्यामुळे जागतिक अनिश्चितता आणि वाढत्या अस्थिरतेमुळे नफा झाला. बेंचमार्क निफ्टी निर्देशांक दिवसाच्या नीचांकी २५०६० वर घसरला, ज्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक कमकुवतपणा दिसून आला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, रिअल्टी आणि तेल आणि वायू काउंटरमध्ये लक्षणीय घसरण दिसून आली, जी गुंतवणूकदारांच्या अलिकडच्या वाढीकडे झुकण्याचा कल दर्शवते.जागतिक आघाडीवर, ऑक्टोबरच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात राजनैतिक आणि आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नियोजि त बैठक असूनही अमेरिका-चीन व्यापारातील संघर्ष सुरू राहिल्याने भावना सावध राहिली. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, आगाऊ- घसरण गुणोत्तर मंदीकडे झुकले. ICICIPRULI, IREDA, MCX, ANGELONE आणि TATAMOTORS मध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली, जी या काउंटरमध्ये वाढलेल्या सट्टेबाजी क्रियाकलाप दर्शवते.'

आजच्या रूपयातील हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'डॉलरच्या व्यापक ताकदीमुळे आणि कमकुवत प्रादेशिक चलनांमुळे भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. अमेरिका-चीन व्यापार अनिश्चितता आणि जोखीम-प्रतिकूल मूडमुळे भावना कमकुवत राहिल्या आहेत. तथापि, गेल्या दोन आठवड्यात मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे आणि परदेशी निधीच्या प्रवाहामुळे रुपयाने लवचिकता दाखवली आहे, एका मर्या दित श्रेणीत ते मजबूत झाले आहे. जवळच्या काळात, स्पॉट डॉलरला ८८.५० वर आधार मिळतो आणि ८९.१० वर प्रतिकाराचा सामना करावा लागतो.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा