Tuesday, October 14, 2025

LG Listing Today: LG Electronics IPO चे आज अखेर लिस्टिंग ५०% प्रिमियमसह गुंतवणूकदारांची ताबडतोड कमाई

LG Listing Today: LG Electronics IPO चे आज अखेर लिस्टिंग ५०% प्रिमियमसह गुंतवणूकदारांची ताबडतोड कमाई

मोहित सोमण : आज अखेर एलजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे दणक्यात लिस्टिंग झाले आहे. तब्बल ५०% प्रिमियम दरासह एलजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. अनेक बाजार विश्लेषकांकडून ४० ते ६०% प्रिमियम दराची अटकळ बांधली जात होती. मोतीलाल ओसवालनेही ५८% अपसाईड (वरच्या दराने प्रिमियम) सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. आज अखेर ५०% प्रिमियम दरासह १७१० रूपये प्रति शेअरसह लिस्ट झाला आहे.

आनंद राठी यांनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियावर बाय रेटिंगसह कव्हरेज देखील सुरू केले आहे. त्यांनी लक्ष्य किंमत (TP) १७२५ रुपये प्रति शेअर ठेवले आहे. ब्रोकरेजच्या मते, सध्याच्या पातळीपेक्षा ही ५१% वाढ दर्शवते. त्यांना वाटते की नावीन्यपूर्णता, वितरण आणि विक्रीनंतरची उत्कृष्टता हे लिस्टिंगनंतरच्या वाढीला आणखी चालना देतील.११६०७.०१ कोटींच्या ऑफर फॉर सेल (OFS) आयपीओला गुंतवणूकदारांनी तुडुंब प्रतिसाद दिला होता. आज सकाळी १०.४० वाजेपर्यंत कंपनीचा शेअर मुळ किंमतीपेक्षा ४६.२५ उसळत १६६८.४० रूपये प्रति शेअरसह व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >