Tuesday, October 14, 2025

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थेट कर्ज पोर्टलचे उद्घाटन

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थेट कर्ज पोर्टलचे उद्घाटन

ऑनलाईन थेट कर्ज योजनेमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक - मंत्री अतुल सावे

मुंबई: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचे पोर्टल मुळे अर्ज प्रक्रिया अ धिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज आणि व्यवस्थापकीय संचालक रविंद्र पेटकर उपस्थित होते. या महा मंडळांतर्गत सध्या १४ उपकंपन्या कार्यरत असून, थेट कर्ज योजना ही महामंडळाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात २८ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आली असून आता पर्यंत ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. शासनाच्या सेवा वित रणातील सुधारणा या उपक्रमांतर्गत आता ही योजना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आली आहे.

या योजनेविषयी मंत्री अतुल सावे म्हणाले आहेत की,'इतर मागास प्रवर्गातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील १८ ते ५५ वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी व्यक्तींना एक लाख रुपयांपर्यंत थेट कर्जाचा लाभ दि ला जातो. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३९२३ लाभार्थ्यांना एकूण २१.०७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.'

इच्छुक लाभार्थ्यांनी msobcfdc.org या संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

Comments
Add Comment