Tuesday, October 14, 2025

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी अनेक लोकल गाड्या तब्बल ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कामाच्या वेळेत झालेल्या या विलंबाचा सर्वाधिक फटका कामावर वेळेत पोहोचण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या हजारो चाकरमान्यांना बसत आहे. या लोकल गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.. यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती आणि कामावर वेळेत पोहोचण्यासाठी त्यांची मोठी धावपळ झाली.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बदलापूरहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.  गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यामुळे बदलापूरहून मुंबई, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >