हमासच्या कैदेतून सर्व २० इस्राायली ओलिसांची सुटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये सुरू केलेल्या शांतता योजनेला यश आले आहे. इस्रायल आणि हमास यांनी ट्रम्प यांच्या शांतता योजनेवर सहमती दर्शवली आहे. गाझामध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या विनाशकारी संघर्षाचा शेवट करण्याच्या दिशेने हा युद्धविराम करार एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या कराराअंतर्गत हमासने उरलेले सर्व इस्रायली ओलिस सोडले आहेत. या युद्धबंदी दरम्यान ट्रम्प इस्रायलमध्ये पोहोचले आहेत.


सर्वप्रथम हमासने सोमवारी आधी ७ आणि त्या पाठोपाठ उर्वरित १३ इस्रायली ओलिसांचीही सुटका केली. याशिवाय, २६ मृत बंदिवानांचे मृतदेह देखील सोडले जाण्याची शक्यता आहे. सकाळी हमासकडून त्या २० ओलिसांची यादी जाहीर करण्यात आली होती, ज्यांची सुटका करण्यात आली.


तेल अवीवमध्ये होस्टेज स्क्वेर येथे शेकडो नागरिक एकत्र आले होते, जे ओलिसांच्या सुटकेनंतर आनंद व्यक्त करत होते. दुसरीकडे, इस्रायली लष्कराने सांगितले की, रेडक्रॉसच्या माध्यमातून गाझामधून बाहेर काढण्यात २० जिवंत ओलिस बाहेर काढण्यात आले. ही सुटका मागील आठवड्यात मिसरमधील शर्म अल-शेख रिसॉर्टमध्ये झालेल्या युद्धविराम कराराच्या पहिल्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे.


दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सध्या मिडल ईस्ट दौऱ्यावर असून ते इस्रायलच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. ट्रम्प यांचे “एअर फोर्स वन” विमान सोमवारी तेल अवीवजवळील बेन गुरियन विमानतळावर उतरले. इस्रायल रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दावा केला होता की, इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता संपुष्टात आले. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली होती की हा युद्धविराम (सीजफायर) टिकून राहील.


गेल्या दोन वर्षांत झालेल्या या युद्धामुळे गाझाचे संपूर्णपणे विध्वंस झाले आहे. गाझा सिटीमध्ये राहणाऱ्या जवळपास सर्वच नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर, शाश्वत शांततेकडे होणारी प्रगती आता जागतिक बांधिलकीवर अवलंबून आहे. यावर मिसरच्या शर्म अल-शेख रिसॉर्टमध्ये ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली २० हून अधिक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिखर परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी

मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे.

भारतावर हल्ल्यासाठी बांगलादेशमध्ये नवीन दहशतवादी तळाची उभारणी

‘मोस्ट वाँटेड’ हाफिज सईदचा कुटिल डाव नवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा व जमात-उद-दावा दहशतवादी संघटनाचा