
मोहित सोमण:वारी रिन्यूऐबल टेक्नॉलॉजी (Waree Renewable Technology) कंपनीचा शेअर आज १३% हून अधिक पातळीवर इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. सकाळी ११.४० वाजेपर्यंत कंंपनीचा शेअर ८.९७% उसळत १२३४.८० पातळीवर पोहोचला आहे. कंपनीने आपल्या तिमाही निकालात चांगली कामगिरी केल्यानंतर गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिला आहे. जून ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील (Q2) कंपनीच्या एकत्रित नफ्यात (Consolidated Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये वाढ झाल्याने शेअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.
कंपनीचा एकत्रित नफा गेल्या तिमाहीत ११६.३४ कोटींवर पोहोचला होता. गेल्या वर्षी हाच एकत्रित नफा ५३.५२ कोटींवर गेला होता. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात ११७.४०% वाढ झाल्याने कंपनीच्या शेअरची मागणी बाजारात वाढली आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) मार्जिनमध्ये वाढ झाली.गेल्या तिमाहीतील ७१.६० कोटींच्या तुलनेत ईबीटा १५७.९० कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे दुप्पटीपेक्षा अधिक वाढ ईबीटामध्ये झाली. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४७.७३% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तिमाहीत महसूल ५२४.४७ कोटी होता तो या तिमाहीत वाढत ७७४.७८ कोटींवर पोहोचला आहे.
कंपनीने महाराष्ट्र आणि राजस्थानमधील स्वतंत्र वीज उत्पादक (IPP) सौर प्रकल्पांसाठी सुमारे १.२५ GWp चे नवीन सौर प्रकल्प ऑर्डर मिळवले आणि भांडवली खर्च (Capital Expenditure) योजना मंजूर केल्या, असे वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजने १० ऑक्टो बर रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच आगामी काळात कंपनीचे विस्तारीकरण अपेक्षित आहेत. वारी रिन्यूएबलची अपूर्ण ऑर्डर बुक (Incomplete Book Order) ३.४८ GWp आहे, जी पुढील १२-१५ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कंप नीकडे २७ GWp पेक्षा जास्त बोली (Bidding) लावण्याची प्रक्रिया देखील आहे, जी भविष्यातील मजबूत शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी मागणी भविष्यात वाढू शकते.