Tata Capital Share Listing: टाटा कॅपिटल आयपीओची निराशाजनक कामगिरी! केवळ १.२३% प्रिमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला, हा शेअर खरेदी करावा? जाणून घ्या

मोहित सोमण:टाटा कॅपिटल लिमिटेड (Tata Capital Limited) आयपीओची निराशाजनक कामगिरी स्पष्ट झाली आहे. आज कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed झाला आहे. त्यामुळे मूळ प्राईज बँड ३२६ रुपये प्रति शेअर तुलनेत कंपनीचा शेअर ३३ ० रूपये प्रति शेअरसह बाजारात सूचीबद्ध झाला. परिणामी केवळ १.२३% प्रिमियम दरासह शेअरने पदार्पण केले. आयपीओ सूचीबद्ध होण्यापूर्वी कंपनीची शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ० रूपये होती. अखेर लिस्टिंगही कमकूवत झाले. कंप नीचा आयपीओ एकूण १.९६ पटीने सबस्क्राईब झाला होता. या पब्लिक इशूपैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.१० पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३.४२ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.९८ पटीने सबस्क्राईब केला गेला होता.६ ते ८ ऑक्टोबर कालावधीत हा शेअर गुंतवणूकदारांसाठी खुला होता. ९ ऑक्टोबरला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात आले होते. त्यामुळेच आज शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध झाला आहे. १५५११.८७ कोटी मूल्य असलेल्या आ यपीओसाठी २१ कोटींचे शेअर खरेदीसाठी उपलब्ध होते. मात्र किरकोळ गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आयपीओला अपेक्षित यश आले नाही. आयपीओपूर्वी कंपनीने ४६४१.८३ कोटींचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केला होता.


नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) टाटा कॅपिटल लिमिटेडच्या आयपीओमध्ये फ्रेश इशू आणि विक्रीसाठी ऑफर (OFS) यांचा समावेश होता, ज्यामध्ये एकूण १० रुपये दर्शनी मूल्याचे (Face Value) सुमारे ४७.५८ कोटी इक्विटी शेअर्स होते. कंपनीने २ १ कोटी नवीन शेअर्स जारी केले, ज्याची किंमत ६,८४६ कोटी रुपये होती आणि विद्यमान भागधारकांनी २६.५८ कोटी शेअर्स विकले, जे एकूण ८६६६ कोटी रुपये होते. या इश्यूद्वारे, टाटा कॅपिटलमध्ये ८८.६% हिस्सा असलेल्या कंपनीच्या प्रवर्तक टाटा सन्सने २३ कोटी शेअर्स विकले, तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ने ३.५८ कोटी शेअर्स विकले.टाटा कॅपिटलचा आयपीओ हा देशांतर्गत भांडवली बाजाराच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा सार्वजनिक ऑफरिंग होता. देशातील एनबीएफसी क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शेअर आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या ३०४३ कोटी रुपयांच्या आयपीओनंतर, टाटा ग्रुपकडून जवळजवळ दोन दशकांत हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता.


हा शेअर खरेदी करावा का?


जेएम फायनान्शियल या ब्रोकरेज कंपनीने 'अ‍ॅड' शिफारस (Add Recommendation) आणि प्रति शेअर ३६० रुपयांच्या किमतीच्या लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह केली आहे. त्यांनी टाटा कॅपिटलवर कव्हरेज सुरू केले आहे. त्यांनी आपल्या अहवा लात सांगितले की कंपनीला टाटा ग्रुपच्या वारशाचा (Legacy) फायदा होईल आणि निधीच्या खर्चाच्या बाबतीत ती चांगल्या स्थितीत आहे. जेएम फायनान्शियलला अशी अपेक्षा आहे की टाटा कॅपिटलचा क्रेडिट खर्च आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या सहामाहीपासून ह ळूहळू कमी होईल आणि मालमत्तेची गुणवत्ता (Asset Quality)सुधारेल. आतापर्यंत २५ हून अधिक कर्ज उत्पादनांच्या पोर्टफोलिओसह, कंपनी नोकरी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, उद्योजक, लघु व्यवसाय, एसएमई आणि कॉर्पोरेट्ससह विविध ग्राहकां ना वित्तीय सेवा देते.


उपलब्ध माहितीनुसार, कर्ज देण्याव्यतिरिक्त टाटा कॅपिटल विमा आणि क्रेडिट कार्ड सारख्या तृतीय-पक्ष उत्पादनांचे (Third Party Aggregator) वितरण करते, संपत्ती व्यवस्थापन (Asset Management) सारख्या सेवा देते तसेच खाजगी इक्विटी फंडांना प्रा योजक आणि गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम देखील करते.

Comments
Add Comment

PSU Q2 Consolidated Results: दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा उच्चांकी,९% विक्रमी वाढून ४९४५६ कोटी रुपयांवर

प्रतिनिधी: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखालील पीएसयु (Public Sector Banks) अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चालू

शिंदेंच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने झिडकारली

संजय गायकवाड-विजयराज शिंदे यांच्यात 'सिटिंग-गेटिंग'वरून जुंपली! बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

NSE Update: GIFT IFSC वर परकीय चलन सेटलमेंट सिस्टीम सेटलमेंटसह NSEICC संस्थेकडून नव्या अध्यायाला सुरूवात

प्रतिनिधी :एनएसई आयएफएससी (NSE IFSC) क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (NSEICC) ही परकीय चलन सेटलमेंट सिस्टम (FCSS) वापरून निधी

मेहली मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर भावनिक पत्र म्हणाले, 'संस्थेपेक्षा कोणी मोठे नाही' पडद्यामागे नक्की घडतंय काय? जाणून घ्या

प्रतिनिधी:रतन टाटा यांच्या निधनानंतर आणखीनच वाढलेला मेस्त्री व टाटा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वमताने

मेहली मिस्त्री यांची धर्मादाय आयुक्तांकडे धाव हकालपट्टीवर कॅव्हेट दाखल करत दिला मोठा 'इशारा'

प्रतिनिधी:टाटा समुहातील वरिष्ठ संचालक व शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांनी आता आपल्या