Monday, October 13, 2025

Stock Market Update: शेअर बाजारात धुळधाण ! सेल ऑफ सह अस्थिरता VIX निर्देशांक १०.७३% गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा फटका

Stock Market Update: शेअर बाजारात धुळधाण ! सेल ऑफ सह अस्थिरता VIX निर्देशांक १०.७३% गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा फटका

मोहित सोमण: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारासाठी सकारात्मक होता. परिणामी निर्देशांकात मोठी रॅली झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व घरगुती गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक राखली गेली. मात्र युएसकडून आणखी अतिरिक्त १००% टॅरिफ ला वल्याचा फटका शेअर बाजारात बसला. विशेषतः आज अस्थिरता निर्देशांकाने १०.७३% उसळल्याने ही पडझड होत आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलातही सगळ्याच निर्देशांकात घसरण झाल्याने आज गिफ्ट निफ्टीसह इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३१०.७२ अंकाने व निफ्टी ८३.७० अंकांने कोसळला होता. बाजारात मोठ्या प्रमाणात सेल ऑफ सुरू राहिल्याने आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये विशेषतः फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. बँक निर्देशांकातही घसर ण झाल्याने सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३९%),फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.२२%), पीएसयु बँक (०.१८%) निर्देशांकात किरकोळ झालेली वाढ वगळता इतर निर्देशांकात घसरण झा ली. सर्वाधिक पडझड तेल व गॅस (०.७९%),आयटी (०.७८%), मेटल (०.५९%), आयटी (०.७८%) निर्देशांकात झाली.

सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ सीई इन्फोसिस्टिम (७.५४%), ज्युबिलंट एनग्रेव्ह (४.१९%), केफिन टेक्नॉलॉजी (३.६७%), एथर एनर्जी (२.९९%), युटीआय एएमसी (२.७९%), फोर्टिस हेल्थ (२.६६%), सारेगामा इंडिया (२.३४%), एचडीएफसी एएमसी (२.२ ६%), बजाज ऑटो (१.२३%), जेएम फायनांशियल (१.१९%), आदित्य एएमसी (०.९०%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (०.८३%), भारती एअरटेल (०.७९%), सिटी युनियन बँक (०.७५%) समभागात झाली आहे.

सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण बीएलएस इंटरनॅशनल (१२.१३%), रिलायन्स पॉवर (५%), रेडिंगटन (३.३६%), सीपीसीएल (२.३५%), टाटा कम्युनिकेशन (२.२८%), ज्योती सीएनसी ऑटो (२.२२%), सिमेन्स (२.०६%), एल टी फूडस (२%), गोदरेज इंड स्ट्रीज (१.९२%), एनएमडीसी स्टील (१.८५%), ब्रेनबीज सोलूशन (१.८२%), झेंसार टेक्नॉलॉजी (१.८१%), बलरामपूर चिनी (१.८०%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (१.८३%),आयटीआय (१.७८%), पतांजली फूड (१.७७%), भारत डायनामिक्स (१.७६%), डीसीएम श्री राम (१.७५%), ग्राविटा इंडिया (१.७५%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >