मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या विळख्यात
October 13, 2025 07:20 AM
मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या विळख्यात अनेक दुकाने सापडली आहे. अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दुकानांना लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झाल्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. आगीमुळे कुर्ला दक्षिणेकडील SCLR पूल तात्पुरता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे .