Monday, October 13, 2025

Gold Silver Rate: सोन्यासह चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोमवारी सोने चांदी जागतिक बाजारपेठेत ४% हून अधिक पातळीवर नेमके विश्लेषण जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्यासह चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोमवारी सोने चांदी जागतिक बाजारपेठेत ४% हून अधिक पातळीवर नेमके विश्लेषण जाणून घ्या

मोहित सोमण:आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरता, अमेरिकेतील राजकीय अस्थिरता, युएस सरकारचे शटडाऊन, डॉलरचा वाढलेला कमोडिटीतील दबाव, जागतिक मागणीत वाढ, व मुख्यतः रुपयांतही झालेली घसरण, भारता तील दिवाळीपूर्व कालालधी अशा कारणांमुळे आज भारतीय सराफा बाजारात सोन्यात पुन्हा एकदा मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पातळीवर सोने पोहोचले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सो न्याच्या प्रति ग्रॅम दरात ३२ रुपयांनी वाढ, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३० रुपयांनी वाढ तर १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२५४० रूपये, २२ कॅरेटसाठी ११४९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९४०५ रूपयांवर पोहोचले आहेत.प्रति तोळा किंमतीत २४ कॅरेटमागे ३२० रुपयांनी, २२ कॅरेटमागे ३०० रूपये, १८ कॅरेटमागे २४० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२५४००, २२ कॅरेटसाठी ११४९५०, १८ कॅरेटसाठी ९४०५० पातळीवर पोहोचले आहेत. भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर महत्वाच्या शहरात सोन्याचा प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२६३३ रूपये, २२ कॅरेटसाठी ११५८० रूपये, १८ कॅरेटसाठी ९५७० रूपयांवर पोहोचले आहेत. याशिवाय भारतीय कमोडिटी बाजारात आज प्रचंड मोठी रॅली गोल्ड कमोडिटीत झाली होती.

आज एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याच्या वायदा दरात २६१३ रुपये किंवा २.१५% वाढ झाली होऊन सोन्याने १२३९७७ रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रमी टप्पा गाठला. फेब्रुवारी २०२६ मध्ये या करारात २२९६ रुपये किंवा १.८७% वाढ झाली आणि तो १२४९९९ रुपये प्रति १० ग्रॅम या त्याच्या आयुष्यातील शिखराच्या जवळ पोहोचला. गुरुवारी या कराराने १२५०२५ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवीन उच्चांक गाठला होता. गेल्या आठवड्यात, सोन्याच्या किमती तब्बल ३२५१ रुपये किंवा २.७५% वाढल्या होत्या आणि गुरुवारी १२३६७७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी टप्पा गाठल्या होत्या, परंतु आठवड्याच्या अखेरीस सौम्य नफा बुकिंग दिसून आली. आता मात्र सोन्याचे दर रिबाऊंड झाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत एम सीएक्समध्ये सोन्याच्या निर्देशांकात २.०६% वाढ झाल्याने दरपातळी १२३७६० रुपयांवर पोहोचली होती.

जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.३५% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक (Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.४०% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४०७४. ७७ औंसवर गेली आहे. जागतिक पातळीवर सोमवारी आशियाई व्यापारात सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आणि ते ४१०० डॉलर प्रति औंसच्या जवळ पोहोचले, कारण अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे सुरक्षित गुंतवणूकीची अथवा मालमत्तेची माग णी वाढली होती. सत्राच्या सुरुवातीला विक्रमी $४०७८.०५ ला स्पॉट गोल्ड १.३% वाढून $४०७०.२९ प्रति औंस झाले. यूएस गोल्ड फ्युचर्स १.६% वाढून $४०८९.४५/औंस झाले होते. त्यामुळे सोन्यात सध्या विक्रमी रॅली सुरू आहे.

आजच्या सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे पुन्हा एकदा सुरक्षित-निवासस्थानाची मागणी वाढल्याने सोन्याच्या कि मतींमध्ये २००० रुपयांची वाढ झाली आणि ते १२३२०० रुपयांच्या वर व्यवहार करत होते. अमेरिकन प्रशासनाने निवडक चिनी उत्पादनांवर १००% कर वाढीची घोषणा केली आहे, तसेच चीनने दुर्मिळ पृथ्वी निर्यात मर्यादित करण्याच्या धमकीमुळे जागतिक अनिश्चि तता आणि जोखीम टाळण्याची शक्यता वाढली आहे. सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांकडून सतत मागणी असल्याने, हा भू-राजकीय तणाव सोन्याचा अंदाज तेजीत ठेवत आहे.'

आज चांदीही विक्रमी पातळीवर -

जागतिक अस्थिरतेचा फटका सोन्यासह चांदीच्या दरातही जाणवला आहे. गेल्या चार दिवसांपासून चांदी प्रति किलो २१००० रुपयांपेक्षा महागली होती. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ५ रुपये वाढ झाली आहे. तसेच प्र ति किलो दर १८५००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ४.१८% इतकी विक्रमी वाढ झाली असल्याने दरपातळी १५२५८६ रूपयांवर गेली. भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १८५० रूपये, प्रति किलो दर १८५००० रूपये आहे. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ५.१३% वाढ झाल्याने मोठी रॅली चांदीच्या दरात झाली. भारतासह मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात घसरण झाल्याने चांदी महागली होती. सणा सुदीच्या काळात वैयक्तिक वापरासह औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने ईटीएफमधील गुंतवणूक वाढली आहे. तसेच स्पॉट बेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे व्यवहार वाढले होते.

अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे पुन्हा एकदा सुरक्षित-निवासस्थानाची मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतींमध्ये २,००० रुपयांची वाढ झाली आणि ते १२३२०० रुपयांच्यावर व्यवहार करत होते. अमेरिकन प्रशासनाने निवडक चिनी उत्पादनांवर १००% कर वाढी ची घोषणा केली आहे, तसेच चीनने दुर्मिळ पृथ्वी निर्यात मर्यादित करण्याच्या धमकीमुळे जागतिक अनिश्चितता आणि जोखीम टाळण्याची शक्यता वाढली आहे. सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांकडून सतत मागणी असल्याने हा भूराजकीय तणाव सो न्याचा अंदाज तेजीत ठेवत आहे. तसेच चांदीतील अस्थिरता वाढत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा