Monday, October 13, 2025

CPI Inflation September- मोठी बातमी जून २०१७ नंतर प्रथमच शीर्ष महागाईत मोठी घसरण 'या' कारणामुळे- सरकार

CPI Inflation September- मोठी बातमी जून २०१७ नंतर प्रथमच शीर्ष महागाईत मोठी घसरण 'या' कारणामुळे- सरकार

नवी दिल्ली:सप्टेंबर महिन्यातील महागाईची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यातील हेडलाईन इन्फ्लेशन (शीर्ष महागाईत) इयर ऑन इयर बेसिसवर १ .५४% घसरण झाली आहे. जून २०१७ नंतर प्रथमच इतकी घसरण झाली आहे. प्रोविजनल आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यातील तुलनेत सप्टेंबर महिन्यातील महागाईत इयर ऑन इयर बेसिसवर ५३ बेसिस पूर्णांकाने घट झाली आहे. प्रामुख्याने सरकारचा जीए स टी दरकपातीचा निर्णय तसेच भाज्यांच्या किंमतीतील घसरणीचा थेट फायदा म्हणून महागाईत घसरण झाली. सीएपीआय (Consumers Food Price Index CFPI) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) सप्टेंबर २०२५ मध्ये घसरण झाली.आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ही सीएफपीआय (Provisional) आकडेवारीनुसार १६४ बेसिस पूर्णांकाने झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील महागाईत (Rural Inflation Rate) ऑगस्ट महिन्यातील १.६९ वरून सप्टेंबर महिन्यात १.०७ वर पोहोचला आ हे. तर शहरी भागातील महागाईत ऑगस्टच्या २.४७ तुलनेत घसरण होत सप्टेंबर महिन्यात महागाई २.०४ पातळीवर पोहोचली.

इतर महागाईची आकडेवारी -

सप्टेंबर २०२५ मध्ये प्रमुख चलनवाढ आणि अन्नधान्य चलनवाढीत झालेली घट ही प्रामुख्याने अनुकूल आधारभूत परिणामामुळे आणि भाज्या, तेल आणि चरबी, फळे, डाळी आणि उत्पादने, धान्य आणि उत्पादने, अंडी, इंधन आणि प्रकाश इत्यादींच्या महागाईत घ ट झाल्यामुळे झाली आहे.

गृहनिर्माण महागाई: सप्टेंबर २०२५ मध्ये वर्ष-दर-वर्ष गृहनिर्माण महागाई दर ३.९८% (तात्पुरता) आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये संबंधित महागाई दर ३.०९% होता. गृहनिर्माण निर्देशांक फक्त शहरी क्षेत्रासाठी संकलित केला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षण महागाई: सप्टेंबर २०२५ मध्ये वर्ष-दर-वर्ष शिक्षणातील महागाईचा दर ३.४४% (तात्पुरता) आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये संबंधित महागाई दर ३.६०% होता. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांसाठी एकत्रित शैक्षणिक महागाई दर आहे.

आरोग्य महागाई: सप्टेंबर २०२५ महिन्यासाठी वार्षिक आरोग्य महागाई दर ४.३४% (तात्पुरता) आहे. ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी संबंधित महागाई दर ४.४०% होता. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांसाठी हा एकत्रित आरोग्य महागाई दर आहे.

वाहतूक आणि दळणवळण: सप्टेंबर २०२५ महिन्यासाठी वार्षिक वाहतूक आणि दळणवळण १.८२% (तात्पुरता) आहे.

ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी संबंधित महागाई दर १.९४% होता. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांसाठी हा एकत्रित महागाई दर आहे.

इंधन आणि प्रकाश: सप्टेंबर २०२५ महिन्यासाठी वार्षिक इंधन आणि प्रकाश महागाई दर १.९८% (तात्पुरता) आहे. ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी संबंधित महागाई दर २.३२% होता. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांसाठी हा एकत्रित महागाई दर आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >