Sunday, October 12, 2025

वादग्रस्त मचाडो

वादग्रस्त मचाडो

यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या राजनैतिक नेत्या मारिया कोरोना मचाडो यांना जाहीर झाला आहे. मचाडो यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही अधिकांरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि न्यायपूर्ण आणि शांततामय पद्धतीने हुकूमशाही प्रवृत्तींना विरोध करून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला असे नोबेल समितीने म्हटले आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा या पुरस्काराचे आपण मानकरी आहोत, असे सांगितले आहे. त्यांनी म्हटले होते, की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध त्यांनी अनेकदा थांबवले आहे आणि त्यांनी असेही सांगितले होते, की सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठीही आपण प्रयत्न केले आहेत. ट्रम्प यांना डावलून मचाडो यांना पुरस्कार जाहीर झाला.

कारण अल्फ्रेड नोबेल यांच्या विचारसरणीनुसार पुरस्कार दिले जातात, असे पुरस्कर्त्यांनी म्हटले होते. त्यामुळे एक हुकूमशहा वृत्तीचे ट्रम्प यांच्यापुढे नोबेल पुरस्कार समिती झुकली नाही, याबद्दल तिचे अभिनंदन करावे लागेल. पण ज्या बातम्या येत आहेत त्यावरून मचाडो यांच्यावरही टीका होत आहे. निकोलस मादुरो सरकारविरोधात अनेक वर्षांपासून आवाज उठवत आहेत, पण मादुरो सरकारने त्यांना निवडणुका लढवण्यापासून वंचित केले होते. कारण २०२३ मध्ये झालेल्या निवडणुका निष्पक्ष नव्हत्या असा दाव केला. मारिआ मचाडो यांना व्हेनेझुएलातील लोकशाहीला प्रोत्साहन दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. असे असले, तरीही व्हेनेझुएलातील बऱ्याच नागरिकांना माहीत आहे, की मचाडो यांनी लोकशाहीच्या आविर्भावात निर्बंध, खासगीकरण आणि परकीय हस्तक्षेपाचे भलामण केले आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर व्हेनेझुएलात आंनंदाची लाट उसळली नाही आणि म्हणावा तसा जल्लोष साजराझाला नाही.

ट्रम्प हे तर हुकूमशाहा आहेतच पण मचाडो याही एकप्रकारे हुकूमशाहीच्याच पुरस्कर्त्या आहेत ही भावना व्हेनेझुएलाच्या नागरिकांमध्ये आजही कायम आहे. शांततेचा पुरस्कार मचाडो यांना देण्यात आला आहे, त्या मचाडो यांचे राजकारण हिंसाचाराने भरलेले आहे असे कित्येक बुद्धीजीवींचे मत आहे. मचाडो यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना आवाहन केले होते, की व्हेनेझुएलाला मुक्त करण्यास मदत करावी. या पार्श्वभूमीवर त्यांना पुरस्कार देण्यात येतो ही देखील निश्चितच अस्वस्थ करणारी बातमी आहे. आतापर्यंत शांतता पुरस्कार मिळालेल्या कोणत्याही नेत्याविरोधात इतके मतप्रदर्शन कधी झाले नव्हते. मचाडो यांचा इतिहास असा आहे, की त्यांनी २००२ मध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या राष्ट्रपतींना उलथवून टाकण्यास मदत केली.

संविधान नष्ट केले आणि प्रत्येक सार्वजनिक संस्था रातोरात नष्ट केली. अशा राजसत्तेला मचाडो यांनी पाठिंबा दिला असे बोलले जाते, असाही आरोप आहे. मचाडो यांनी अमेरिकन निर्बंधांची पाठराखण केली आणि त्यामुळे व्हेनेझुएलातील गरीब आणि अपंग आणि कामगार यांना आजही त्याची किंमत चुकवावी लागत आहे. इतके असूनही मारिओ मचाडो यांना पुरस्कार का देण्यात आला? तर व्हेनेझुएलातील हुकूमशाहीतून लोकशाहीकडे संक्रमण आणि तेही शांततापूर्ण मार्गाने करण्यात आल्याबद्दल जे कार्य केले त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. मचाडो यांनी तथाकथित व्हेनेझुएलातील कठपुतळी सरकार प्रस्थापित करण्यास मदत केली, असाही त्यांच्यावर आरोप आहे. जेरूसलेममध्ये मचाडो यांनी पुन्हा व्हेनेझुएलाचा दूतावासा सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले, असाही त्यांच्यावर आरोप आहे. मचाडो यांनी २०१४ मध्ये अशा निदर्शनांत सहभाग घेतला, की जी निदर्शने शांततापूर्ण नव्हती. मचाडो या लोकशाहीच्या पुरस्कर्त्या वाटत असल्या तरीही त्या फॅसिसम, झिओनिझम आणि नव उदारमतवाद यांचे प्रतीक मानल्या जातात असा त्यांच्यावर अनेकांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुरस्कार तपासला गेला पाहिजे.

अर्थात त्यांच्या कार्याचे मोल यामुळे कमी होत नाही, त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीत व्हेनेझुएलातील लोकशाही आणि तेथील लोकांच्या भावनांना जपत लोकशाही प्रस्थापित केली हे विसरून चालणार नाही. कारण व्हेनेझुएला हा देश खरेतर अत्यंत गरीब देश होता. पेट्रोलचे साठे सापडल्याने तो श्रीमंत झाला. त्यांनंतर तेथील लोकांना लोकशाही आणि आपली पूर्वीची गरिबी कशाचीच बूज वाटेनाशी झाली होती. निकोलस मादुरो यांचा हाच तो काळ. पण त्यानंतर व्हेनेझुएलाच्या नागरिकांना इतकी गरिबी आली, की लोकांना अन्नासाठीही वणवण करावे लागले. दोन्ही काळ देशाने पाहिले आहेत. त्या परिस्थितीत लोकशाहीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मचाडो यांना लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ही जागतिक शांततेचा पुरस्कार देण्यात आला. मचाडो यांना पुरस्कार देण्यात आला, कारण त्यांनी लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली आहे. हे नोबेल समितीचे भाष्य पुरेसे बोलके आहे. आल्फ्रेड नोबेल यांनी म्हटले होते, की शांतता पुरस्कार त्याच व्यक्तींना देण्यात येतो ज्यांनी देशांदेशांतील बंधुत्वासाठी सैन्याची कपात आणि शांतता परिषदांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतो. या सर्व बांबींवर मचाडो या आघाडीवर आहेत आणि त्यांचे टीकाकार काहीही म्हणोत, पण मचाडो यांनी आज व्हेनेझुएलाचे नाव जागतिक शांतता पुरस्कारावर कोरले आहे. मचाडो यांचे विरोधक काहीही म्हणत असले तरीही नोबेल यांनी घालून दिलेल्या निकषांचे पालन करत असल्याने त्यांना पुरस्कार देण्यात आला हेच सत्य आहे.

मचाडो या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी मला धक्का बसला आहे अशी प्रतिक्रिया दिली. ५८ वर्षीय मचाडो या पारदर्शक लोकशाहीसाठी मोहीम राबवतात. त्यांच्या दृष्टीने वजाबाकीची बाजू म्हणजे त्या उदारमतवादी सुधारणाचे समर्थन करतात. त्यांचा लढा हा आयुष्यभर निकोलस मादुरोविरोधात राहिला आणि त्यांनी मादुरो राजवटीविरोधात लोकांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला. या दृष्टीने त्यांची तुलना ऑँगसान स्यू की यांच्याशी केली जाऊ शकते. मचाडो यांना मादुरो समर्थकांनी धमक्या दिल्या आहेत आणि त्यांचे जिणे हलाखीचे करून टाकले आहे. पण या संघर्षात त्यांनी लोकशाहीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम केले आहे आणि हीच त्यांच्या पुरस्काराचे महत्त्व सांगणारी बाब आहे. सध्या त्या भूमिगत आहेत.

Comments
Add Comment