रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेतून २.३० किलो सोने लंपास

अमरावती : रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले बडनेरा रेल्वे स्थानकावरून जळगाव कडे निघालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या बॅगेतील तब्बल २ किलो ३०० ग्रॅम सोने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.


सराफा व्यापारी किशोर वर्मा हे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जळगाव वरून अमरावतीमध्ये व्यापाऱ्यांना दागिने दाखवण्यासाठी आले होते. दिवसभर व्यापार्यांना दागिने दाखवून आणि ऑर्डर घेऊन सायंकाळी ते हावडा-मुंबई मेलने जळगावला परत जाण्यासाठी बडनेरा स्थानकावर पोहोचले.


ट्रेनमध्ये चढताच त्यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अचानक गायब झालेली त्यांच्या लक्षात आले . बॅगमध्ये २.३० किलो सोने होते. घटनेची माहिती वर्मा यांनी तात्काळ दिली त्यानंतर रेल्वे पोलीस स्टेशन, बडनेरा येथे तक्रार दाखल केली.रेल्वे पोलीसांनी स्थानकाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप चोरट्याचा थांगपत्ता लागलेला नाही.


या धाडसी चोरीमुळे अमरावतीतील सराफा व्यवसायामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिका नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी या भागातील