Sunday, October 12, 2025

बिहारमध्ये पेच सुटला, एनडीएचे जागावाटप जाहीर

बिहारमध्ये पेच सुटला, एनडीएचे जागावाटप जाहीर

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाल्यानंतर काही जागांवरुन वाद झाला आणि नवा पेच निर्माण झाला. अखेर हा पेच सुटला आणि एनडीएने जागावाटपाचे नवे सूत्र जाहीर केले. यानुसार जनता दल संयुक्त अर्थात जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (बीजेपी किंवा भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल, ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यात जेडीयू आणि बीजेपी (भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत.

मागील निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट उत्तम होता. भाजपने २०२० मध्ये ११० जागा लढवून ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजप १०१ जागा लढवणार आहे. भाजपने नऊ जागांचे बलिदान मित्रपक्षांसाठी दिले आहे. यंदा एनडीएमध्ये दोन पक्ष वाढले आहेत. तर एक पक्ष आघाडीतून बाहेर पडला आहे. लोजप (आर) आणि रालोमो पुन्हा एनडीएमध्ये परतले आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपने (आर) जागावाटपात २९ जागा मिळवल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत लोजप स्वबळावर लढला होता. त्यांनी १३४ जागांवर उमेदवार दिले. यातील बहुतांश जागा एनडीएमध्ये जेडीयूच्या वाट्याला गेल्या होत्या. भाजपला केवळ १ जागा जिंकता आली. पण लोजप उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे जेडीयूने जवळपास ३५ जागा गमावल्या. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणारा जेडीयू २०२० मध्ये ४३ जागांवर आला. जेडीयूने ३५ जागा गमावल्याने भाजप एनडीएमध्ये आपोआप मोठा भाऊ झाला. एनडीएला १२५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना काठावरचे बहुमत मिळाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा