Sunday, October 12, 2025

फिल्मफेअरच्या स्टेजवरील शाहरूखच्या 'त्या' कृतीची सोशल मीडियात चर्चा

फिल्मफेअरच्या स्टेजवरील शाहरूखच्या 'त्या' कृतीची सोशल मीडियात चर्चा

मुंबई : बॉलिवूड का बादशाहा अशी ओळख असलेला शाहरुख खान नेहमीच कोणत्या तरी कारणामुळे लक्ष वेधून घेतो. असाच लक्षवेधी क्षण फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान घडला. पुरस्कार घेण्यासाठी अभिनेत्री निशांती स्टेजवर येत होती. शाहरुख खान तिच्या स्वागतासाठी पुढे आला होता. तिने परिधान केलेल्या लांब ड्रेसमुळे स्टेजवर येताना ती अडखळली. तिचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात शाहरुख खानने तिला सावरले. यामुळे पडण्यापासून निशांती वाचली. या गोष्टीमुळे शाहरुख खानला कलाकारांची काळजी असल्याचे लक्षात आले.

फिल्मफेअर २०२५ मध्ये गौरी राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने ने १३ पुरस्कार जिंकत नवा रेकॉर्ड बनवला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट संगीत असे विविध १३ पुरस्कार ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने मिळवले.

निशांती गोयलला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी पुरस्कार मिळाला. बक्षीस घ्यायला जाताना निशांती स्जेवर पडता पडता वाचली. शाहरुखने निशांतीला सावरले. निशांती आणि शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे दोघेही चर्चेत आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा