विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार स्थानकावरून दुपारी ३:४५ वाजता डहाणूच्या दिशेने सुटलेली लोकल ट्रेन काही अंतरावर गेल्यानंतर विरार–वैतरणा दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने थांबली. घटनेनंतर जवळपास अर्धा तास उलटूनही लोकल सुरू झाली नव्हती, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. उष्णतेमुळे आणि गर्दीमुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाले होते. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र या बिघाडाचा परिणाम विरार–डहाणू मार्गावरील लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments
Add Comment

छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा