Sunday, October 12, 2025

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आगामी २०२६ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असलेल्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया सर्वप्रथम राबवली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा राज्यांमध्ये आसम, केरळ, पुडुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. या पाच राज्यांबरोबरच काही इतर राज्यांमध्येही पहिल्या टप्प्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.ज्या राज्यांमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत किंवा होणार आहेत, तेथे एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा