Saturday, November 22, 2025

अफगाणिस्तानच्या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

अफगाणिस्तानच्या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

काबुल : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाईत आतापर्यंत पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार झाले आणि ३० सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या २५ चौक्या आणि त्या भोवतालचा परिसर हे सर्व अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. ही माहिती अफगाणिस्तानच्यावतीने देण्यात आली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आकडेवारीवर अद्याप भाष्य केलेले नाही.

इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार झाल्याचे आणि ३० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले. पाकिस्तानचा मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केल्याचे अफगाणिस्तानने जाहीर केले. पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षात स्वतःचे २० सैनिक मारले गेल्याचे अफगाणिस्तानच्यावतीने सांगण्यात आले.

कतार आणि सौदी अरेबिया यांनी केलेल्या विनंतीला मान देत अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्धची लष्करी कारवाई काही तास थांबवली होती. पण ही कारवाई पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांचा पुरेपूर बदल घेणार असल्याचे संकेत अफगाणिस्तानच्यावतीने देण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या भूमीवर आयसिसचे दहशतवादी प्रशिक्षण घेत आहेत. हे दहशतवादी अफगाणिस्तान विरोधात कारवाया करत आहेत. अफगाणिस्तानला असलेला हा धोका पाकिस्तान नष्ट करणार नसेल तर अफगाणिस्तानला स्वतःलाच हे संकट दूर करण्यासाठी आवश्यक ते उपाय करावे लागतील; असेही अफगाणिस्तानच्यावतीने सांगण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >