
कराची :अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष झाला आहे. ताज्या अहवालानुसार, या चकमकीत १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून, अफगाण सैनिकांनी सीमेवरील पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे.
हा संघर्ष मुख्यतः पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला विभागणाऱ्या ड्युरंड लाइन जवळील अनेक भागांमध्ये झाला पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूल येथे हवाई हल्ला केल्यानंतर तालिबानने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला.
पाकिस्तानने ९ ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूदला निशाणा बनवत अनेक हवाई हल्ले केले होते. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानने २०१ खालिद विन वलीद आर्मी कोरने ११ ऑक्टोबरच्या रात्री उिरा नंगरहर आणि कुनार प्रांतात ड्युरंड लाईनजवळ पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला सुरू केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी लढवय्यांनी अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या असून, पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यावी लागली आहे. हा वाढता तणाव दोन्ही देशांमधील संबंधांना अधिक बिघडवत आहे, ज्याचे मूळ कारण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया आणि वादग्रस्त ड्युरंड लाइन आहे.