
प्रतिनिधी:नव्या जाणीवांमुळे व जीएसटी कपातीसह वाढलेल्या व्याप्तीमुळे सप्टेंबर महिन्यात आयुर्विम्यात (Life Insurance) इयर ऑन इयर बेसिसवर १४.८१% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात ही ७.६४% वाढ झाली आहे. लाईफ इन्शुरन्स का ऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, नव्या बिझनेस प्रिमियममध्ये सप्टेंबर २०२४ मधील ३५०२० कोटींवरून वाढ होत सप्टेंबर २०२५ मध्ये ४०२०६ कोटींवर वाढ झाली आहे. इयर टू डेट (YTD) बेसिसवर ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर २०३६६८ कोटीवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात ही १८९२१४ कोटींवर पोहोचली होती. व्यक्तिगत विम्यात ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४५१५.७८ कोटींवर सप्टेंबर महिन्यात पोहोचली आहे. तर इयर टू डेट वाढ ४.९९% झाली आहे.व्यक्तिगत एक व्यक्तीहून अ धिक व्यक्तींसाठी असलेला प्रिमियम इयर ऑन इयर बेसिसवर १०८३७ कोटीवर गेला आहे. तर समुह प्रिमियम (Group Premium) बाबतीत ही वाढ ३२.३९% झाली आहे. तर या श्रेणीतील प्रिमियम ३५.२३% वाढला असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले.
वाढत्या जाहीरांतीसह विम्याच्या महत्वाचे लोकशाहीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने तळागाळातील लोकांपर्यंत विमा पोहोचत आहे. याशिवाय यंदा केलेल्या जीएसटी कपातीमुळेही बिझेनस प्रिमियममध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशिष्ट श्रे णीतील विम्यासह आयुर्विमा व आरोग्यविम्यावर सरकारने १८% वरून ०% जीएसटी आणला. परिणामी ही वाढ अपेक्षित आहे.या उद्देशाने, जीवन विमा कंपन्यांनी ५३९८०४ पेक्षा जास्त वैयक्तिक जीवन विमा एजंट जोडले, ज्यामुळे एकूण एजंट संख्येत ३.७१% वाढ झाली.