'हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही': उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा

३२ हजार कोटींच्या मदतीने विरोधकांचे राजकारण हाणून पाडले; 'मुंबई मनपासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा'


छत्रपती संभाजीनगर: पूरग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने जाहीर केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पॅकेजमुळे विरोधी पक्षांचे राजकारण यशस्वी होणार नाही, असे थेट विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना गटप्रमुखांच्या कार्यशाळेत आणि मेळाव्यात बोलत होते.



ठाकरेंवर जोरदार निशाणा


शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले की, २०२२ मध्ये खुर्ची गेल्यानंतर, लोकसभा निवडणुकीत लोकांची साथ न मिळाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवून केवळ वीस जागा जिंकल्यानंतर ठाकरेंनी 'हंबरडा फोडला' होता.


आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यावर फोडण्यासाठी त्यांनी 'थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा,' असा उपरोधिक सल्लाही शिंदे यांनी दिला.



'घरात बसून नव्हे, फील्डवर काम करणारे'


विरोधकांच्या कार्यशैलीवर टीका करताना शिंदे म्हणाले, "आम्ही घरात बसून नाही, तर प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे आहोत. त्यामुळेच ब्रिटनचे पंतप्रधान आमच्याशी बोलतात, तर काही जण लंडनच्या फेऱ्या मारून रिकाम्या हाताने परततात." यातून त्यांनी स्वतःच्या कामाचा धडाका आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.



मराठवाड्याला प्राधान्य


राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि अडचणीच्या काळात शिवसेना नेहमी पुढे असते. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला गती देऊन महायुती सरकारने मराठवाड्याला प्राधान्य दिले. महायुतीची पहिली कॅबिनेट बैठकही मराठवाड्यातच घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणीही सुरू केली, असे शिंदे यांनी नमूद केले.



शिवसैनिकांना निवडणुकीसाठी आवाहन


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. मतदार याद्यांचा बारकाईने अभ्यास करून पक्षाने लाँच केलेल्या विशेष ॲपचा वापर करावा, असे निर्देश त्यांनी विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि आमदारांना दिले.


आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होताना शिवसैनिकांनी मतदार याद्यांचा बारकाईने अभ्यास करावा. या निवडणुकांसाठी पक्षाने विशेष ॲप लाँच केले असून त्याची माहिती करून घ्यावी. प्रत्येक विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, आमदार, खासदारांनी त्यानुसार प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे असे आवाहन याप्रसंगी केले.


या मेळाव्यात विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा मिरज (सांगली):

भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)

फडणवीसांकडून योगेश कदमांची पाठराखण! 'परवाना दिलाच नाही, तर आरोप कशाला?'

नाशिक : पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना (बंदुकीचा परवाना) देण्याच्या