
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या घटनांमुळे चर्चेत आली आहेत. एकापाठोपाठ एक अशा मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे. हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील एका शिक्षण संस्थेमध्ये (Talasande School Violence) मोठ्या विद्यार्थ्यांनी लहानग्या विद्यार्थ्यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर आले होते. या अमानुष कृत्याची दखल कोल्हापूर पोलिसांसह जिल्हा प्रशासनानेही गंभीरपणे घेतली आणि कारवाई सुरू केली. तळसंदे येथील घटनेचा व्हिडिओ ताजा असतानाच, आता दुसऱ्या एका संस्थेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पेठवडगाव परिसरातील अन्य एका शिक्षण संस्थेतील वसतिगृहाचा हा व्हिडिओ आहे, ज्यात विद्यार्थ्यांमध्ये मारामारी आणि हिंसक कृत्य दिसत आहे. या दोन घटनांमुळे वसतिगृहांमधील वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे: खासगी वसतिगृहांमध्ये सर्रासपणे रॅगिंग सुरू आहे का? की, विद्यार्थ्यांनी लहान वयातच टोळ्या करून, 'मिशा फुटण्यापूर्वीच मर्दुमकी गाजवण्यास' सुरुवात केली आहे? या प्रकरणांची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीरपणे हाताळला जाईल.

नोर्वे: मागील अनेक दिवसांपासून यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु होती. अखेर १० सप्टेंबरच्या सायंकाळी नोबेल ...
तळसंदेनंतर आता पेठवडगावात विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram
हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील घटनेनंतर आता पेठवडगाव परिसरातील एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी एकाच विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मारहाण करणारे अनेकजण असून, या क्रियेत त्या मार खाणाऱ्या विद्यार्थ्याचे हात अक्षरशः तुटून पडल्याचे अर्थात, गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. मारहाण करणारे विद्यार्थी त्याला बाथरूमपर्यंत घेऊन गेले आणि तिथेही ही अमानुष मारहाण सुरू ठेवल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होते. मारहाण कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पेठवडगाव येथील हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची माहिती सध्या शिक्षण संस्थेकडून घेतली जात आहे. मात्र, या घटनांमुळे संस्थांच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या वसतिगृहांमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून ही बेदम मारहाण केली जात आहे, ते पाहता या शिक्षण संस्थांमध्ये व्यवस्थापनाचा काही रोल आहे की नाही? असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे. सततच्या या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
होस्टेलमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत का?
आता पालकांमध्ये 'होस्टेलमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत का?' असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ विद्यार्थ्यांकडूनच नव्हे, तर शिक्षकांकडूनही मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल (११ ऑक्टोबर) व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित शिक्षण संस्थेने कारवाई केल्याचे जाहीर केले असले, तरी परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. त्या संस्थेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांकडूनसुद्धा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. तळसंदे येथील या शिक्षण संस्थेची प्रतिमा गेल्या काही महिन्यांपासून डागाळली आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या संस्थेमधील अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर चर्चेत आहेत. काही व्हिडिओ समोर आल्यानंतर संस्थेने केवळ 'खुलासा' केला असला तरी, यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. कारण चौकशीसाठी गेलेल्या शैक्षणिक अधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांनी खासगीमध्ये बोलताना आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावरून, तळसंदेतील या संबंधित शिक्षण संस्थेत नेमके काय आणि किती गंभीर घडामोडी सुरू आहेत, याचा अंदाज येण्यास पुरेसे आहे. पालकांनी आता आपल्या पाल्यांच्या सुरक्षेसाठी चिंता व्यक्त केली आहे.