मुंबईत यंदा छट पुजा ठिकाणांमध्ये वाढ, आणखी २० पूजा ठिकाणे वाढणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, शहर आणि उपनगरातील एकूण ४० पूजा स्थळे यासाठी निश्चित करण्यात आली होती, परंतु भाजपाच्या मागणीनंतर आता हा आकडा ६० पूजा स्थळापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. या छट पुजे करता महापालिकेकडून विविध सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे.


मुंबई परिसरात २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजऱ्या होणाऱ्या छट पुजेनिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि महापालिकेची तयारी याबाबत महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आढावा घेतला.


या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त प्रशांत सकपाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतकुमार दहिया, उत्तर भारतीय जनता परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांच्यासह छट पूजा उत्सव समित्यांचे ५५ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी समितीच्या सूचनांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. त्यानुसार मुंबईतील पूजा स्थळे निश्चित करून, त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रकाश झोत, पूजेसाठी टेबल, वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि महिला भाविकांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालिकेचे उपायुक्त प्रशांत सकपाळे यांनी दिली.


छट पूजा उत्सवाच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी शहरातील वाहतूक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवावी. त्यानुसार मेट्रो, बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासंदर्भात पालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आणखी काही छट पूजा मंडळांना पूजा स्थळांची परवानगी हवी असल्यास तत्काळ एक खिडकी योजना सुरु करून मंडळांना परवानगी द्यावी आणि ही परवानगी गणेशोत्सवाप्रमाणेच पुढील पाच वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अश्या सूचना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी केल्या असून, त्यालाही अधिकाऱ्यांनी यावेळी मान्यता दिली.


मुंबई परिसरात रात्री उशिरा छटपूजेकरिता मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात, त्यामुळे सर्व पूजा स्थळांवर चोख पोलीस बंदोबस्त यासह सुरक्षेकरिता सी.सी टीव्ही बसवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतकुमार दहिया यांनी स्पष्ट केले.



साटम यांनी सैनींना झापले


या बैठकीला प्रथम अतिरिक्त आयुक्त अमित सैनी हे उपस्थित नव्हते आणि उपायुक्त सपकाळे यांनीच ही बैठक घेतली, यावर अमित साटम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साटम यांचा पारा वाढल्यानंतर सैनी धावत धावत बैठकीसाठी उपस्थित राहिले. त्यानंतर सैनी यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्री बैठकीचे आयोजन करत असताना अतिरिक्त आयुक्तांना उपस्थित राहावेसे वाटत नाही का, असा सवाल सैनींचा समाचार घेतल्यानंतर याबाबतही त्यांनी आयुक्तांकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!

मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

डिसेंबरनंतर होणार कामांना सुरुवात मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व)