‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल


गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय शिक्षण नवी मुंबईच्या भारती विद्यापीठ स्कूलमध्ये झाले तसेच तिचे कॉलेजचे शिक्षण देखील त्याच भारती विद्यापीठामध्येच झाले. शालेय जीवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. तिने फार्मसी केले. त्या वेळेला तिला कला शाखेत प्रवेश घ्यायचा होता, परंतु घरच्यांच्या सांगण्यावरून तिने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. तिने आईला सांगितले होते की, तिला अभिनयाच्या क्षेत्रात जायचे आहे. फार्मसीच्या शेवटच्या वर्षी असताना तिने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. कॉलेजच्या दरम्यान तिच्या एका मैत्रिणीच्या डान्स शोला ती गेली होती. त्यावेळी झी वाहिनीने तिला एका जाहिरातीसाठी विचारले. त्यानंतर तिला ‘अवघाची संसार’ या मालिकेमध्ये काम करण्यास मिळाले, तर स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वप्नांच्या पलीकडले’ ही मालिका तिला मिळाली. या मालिकेमध्ये वैदेही नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ती श्रीमंत घराण्यातून आलेली असते.


तिचे एका गरीब मुलाशी प्रेम होते. शेवटी त्यांच लग्न होतं. लग्नानंतर त्याचं आयुष्य कसं असतं हे सारं त्या मालिकेमध्ये पहायला मिळाले. ती एक लव स्टोरी होती, वैदेहीला काही वाईट वाटले, श्रेयसला काही वाईट वाटले, तर प्रेक्षकांना देखील वाईट वाटायचे. त्यामुळे प्रेक्षकांचा त्या मालिकेला भरपूर प्रतिसाद मिळाला. आज देखील लोक तिला वैदू या नावाने हाक मारतात. तिला प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम आज देखील आठवत आहे. एक ८० वर्षांची आजारी आजीबाई तिला भेटायला लांबून सेटवर आल्या होत्या, तिला पाहताच त्या म्हणाल्या, “वैदू तू मला खूप आवडतेस” असे सांगून त्यांनी तिचे लाड केले. त्यानंतर तिने चंद्रकांत कुलकर्णीचा फॅमिली कट्टा चित्रपट केला. त्यानंतर कान्हा, फ्रेंड, अधम हे चित्रपट तिने केले. त्यानंतर तिने गोदावरी हा चित्रपट केला. दिग्दर्शक निखिल महाजनांच्या गोदावरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.


त्यानंतर तिला वडापाव चित्रपट मिळाला. अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकचा हा शंभरावा चित्रपट आहे. त्याचा एकदा गौरीला फोन आला होता की, मी एक वडापाव नावाचा चित्रपट करीत आहे आणि त्यामध्ये एक आव्हानात्मक भूमिका आहे, यापूर्वी अशा प्रकारची भूमिका तू केली नसल्याने, ती भूमिका करायला तुला आवडेल का? गौरीला प्रसाद सोबत काम करायचे होते, त्यामुळे तिने लगेच होकार दिला.
या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी तू काय सांगशील, असे विचारले असता ती म्हणाली की, यामध्ये मी गौरी नावाची व्यक्तिरेखा साकारीत आहे. जी नवीन जनरेशनचे नेतृत्व करीत आहे आणि तिचा प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आजच्या काळातील ती मुलगी आहे आणि प्रेमासाठी वाटेल ते करायची तिची तयारी आहे.


या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग झाले. तिथे कमी वेळेत, जास्त काम करावयाचे होते, दिग्दर्शक प्रसाद ओकने शूटिंगचे चांगले नियोजन केल्यामुळे चित्रपट चांगला तयार झाला आहे. तिथले वातावरण खूप चांगले असल्यामुळे, सगळ्यांन काम करण्यात फ्रेशनेस जाणवला. या चित्रपटामध्ये सोनू निगमने एक गाणे गायले आहे. बेला शेंडे, सावनी रवींद्र यांनी देखील गाणी गायली आहेत. कुणाल करण यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.


मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही याविषयी तुला काय वाटतं असे विचारल्यावर ती म्हणाली की, या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी म्हटल्याप्रमाणे निर्मात्यांनी चित्रपट रिलीज करण्याच्या अगोदर आपसामध्ये चर्चा कराव्यात. दोन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज करू नये. त्यामुळे सर्व मराठी चित्रपटांना थिएटर मिळतील.

Comments
Add Comment

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

कलात्मक दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की

नाईलाजांच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

पाचवा वेद : भालचंद्र कुबल यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता

मराठी चित्रपटात नावीन्य हवे

युवराज अवसरमल नावीन्याचा ध्यास घेऊन नवीन कलाकृती दिग्दर्शित करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील