हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मा यांचा एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे दोघांचे नाते लक्ष वेधून घेत असून, त्यांच्या अफेअरच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.


विमानतळावर दोघेही एकत्र पाहिल्यानंतर, अनेकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की हार्दिक आणि माहिकामध्ये खास नातं आहे. त्यानंतर हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत या चर्चांना आणखी बळ दिलं आहे. या फोटोंमध्ये हार्दिक आणि माहिका समुद्रकिनाऱ्यावर एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे, तर दुसऱ्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये दोघेही एकत्र पोज देताना दिसत आहेत.


माहिकानेही हार्दिकच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा एक खास फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या बोटांवर "२३" असा क्रमांक लिहिलेला आहे. हा क्रमांक हार्दिक पांड्याच्या जर्सीचा आहे. त्यामुळे चाहत्यांनी याचा संदर्भ त्यांच्या नात्याशी जोडला आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आपल्या कारमधून उतरून माहिकाची वाट पाहताना दिसत आहे आणि ती आल्यावर ते दोघेही एकत्र विमानतळाकडे रवाना झाले. या क्षणांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले असून, हार्दिक आणि माहिकाचे नाते आता चर्चेचा विषय बनले आहे.


याआधी हार्दिकचे लग्न मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत झाले होते. मात्र जुलै २०२४ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केलं. सध्या ते आपल्या मुलगा अगस्त्यचे सह-पालकत्व करत आहेत.


हार्दिकचे नाव यापूर्वी अभिनेत्री ईशा गुप्तासोबतही जोडले गेले होते. मात्र तिने हे संबंध फेटाळून लावत स्पष्ट केलं होतं की ते दोघं काही काळ एकमेकांशी संवादात होते, पण त्यांचं नातं कधीच डेटिंगच्या टप्प्यावर गेलं नव्हतं.


माहिका शर्मा ही अर्थशास्त्र (Economics) आणि वित्त (Finance) विषयातील पदवीधर असून, तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आयएफए मॉडेल ऑफ द इयर’ आणि ‘एले मॉडेल ऑफ द सीझन’सारख्या पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच

बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल! दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी