
नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक मोठी आणि खास मागणी केली आहे. प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर नियम लागू असले तरी, मुलांना दिवाळी ‘हिरव्या फटाक्यांसह’ (ग्रीन क्रॅकर्स) पूर्ण उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारने केली आहे.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला विनंती केली की, “आपल्या मुलांना दिवाळी पूर्ण उत्साहात आणि आनंदात साजरी करू द्या.” हिरवे फटाके प्रदूषण कमी करतात आणि त्यांचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे, असे सरकारचे म्हणणे आहे