Saturday, October 11, 2025

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी असेल यावर राज्य शासनाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ०९ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडत ही चक्राकार पद्धतीने काढण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. पण या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग निवडणुकीत थेट विभाजन करेल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग निवडणुकीत थेट निवडून येणारे दोनशे सत्तावीस पालिका सदस्य असतील. आणि महिलांकरीता तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यातील व्यक्तींकरीता महानगरपालिकेतील प्रभागांमध्ये पालिका सदस्यांच्या राखीव जागांचे वाटप करण्याच्या आणि त्या चक्रानुक्रमे फिरवण्याच्या संबंधात ही अधिसूचना जारी करून मुंबई महापालिकेला आदर्श कार्यप्रणाली नेमून दिली आहे. ज्यामुळे आता आधी अनुसूचित जमाती.महिला आणि खुला प्रवर्गाच्या १७ जागा आणि अनुसूचित जमातीच्या ०२ जागा आणि इतर मागासवर्गीयांच्या ६१ जागा यांचे महिला आणि पुरुष असे आरक्षण काढले जाईल आणि त्यानंतर उर्वरित सर्वसामान्य गटातील प्रभागाचे आधी महिला प्रवर्ग यांचे आरक्षण काढून उर्वरित सर्व प्रभागखुला प्रभाग म्हणून जाहीर केला जाईल. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढले जाईल. चक्राकार पद्धतीमुळे सध्या असलेले सर्व आरक्षित प्रभाग बदलले जातील. यंदा यापूर्वीचे चक्राकार पद्धत प्रभाग आरक्षण काढण्याची प्रथा बंद करून नव्याने प्रभाग आरक्षण काढले जाईल अशी चर्चा होती. पण आता चक्राकार पद्धतीनुसार आरक्षण काढले जाणार असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >