मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. अरमान आपल्या दोन्ही पत्नींसोबत एकाच छताखाली राहत असल्यामुळे त्याने हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
अरमान मलिकने आता भारत सोडून दुबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे त्याने रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला आहे. तर दुबईला जाण्यावरुन तो म्हणाला की, दुबईमध्ये दोन बायका एकत्र असणे कायदेशीर आहे. त्यामुळे त्याला तेथे कोणत्याही कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. त्याच्या या निर्णयाशी त्याची दुसरी पत्नी कृतिका देखील पूर्णपणे सहमत आहे. दरम्यान अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींनी घटस्फोटाच्या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने अमान मलिकला त्याच्या एका पत्नीला घटस्फोट देण्याचे आदेश दिले होते. अन्यथा, त्याला कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेले असते. त्यामुळे त्याने पहिली पत्नी पायलला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असून दुसरी पत्नी कृतिका मलिकसोबत आपले जीवन सुरू ठेवणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
कोण आहे अरमान मलिक? अरमान मलिका हा मुळचा हरियाणाचा असून तो प्रसिद्ध युट्यूबर आहे. बीग बॉस सिझन ३ मधील त्याच्या खेळामुळे तो अधिक प्रसिद्धीस आला. २०११ मध्ये त्याने पायल मलिकसोबत लग्न केले. त्यानंतर सहा वर्षांनी त्याने कृतिका मलिकसोबत लग्न केले. अरमानला पायलपासून तीन मूलं आहेत. तर कृतिकापासून एक मुलगा आहे. हे संपूर्ण कुटूंब एका छताखाली राहते. त्याच्या युट्यूब वाहिनीचा मुळ विषय हा फॅमिली व्लोगिंग आहे.






