मोहित सोमण:आज आठवड्यातील अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली आहे. प्रामुख्याने बँक निर्देशांकासह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजाराला रॅ ली प्राप्त झाली आहे. त्यातुलनेत क्षेत्रीय विशेष लार्जकॅप शेअर्समध्ये 'कंसोलिडेशन' सुरु असल्याने आज नफा बुकिंगही अपेक्षित आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १६६.३२ व निफ्टी ३१.८५ अंकाने उसळला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ कंज्यूमर ड्युरेबल्स (०.७२%), तेल व गॅस (०.५३%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक २५/५० (०.४१%), बँक (०.३५%) निर्देशांकात झा ली असून सर्वाधिक घसरण मेटल (१.४१%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.४४%), हेल्थकेअर (०.३३%) निर्देशांकात झाली आहे.आज मात्र ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाल्याने बाजारा हिर व्या रंगात दर्शवत होती. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, अँक्सिस बँक, टाटा मोटर्स अशा दिग्गज शेअर्समध्ये वाढ झाली असून घसरण मात्र हिंदुस्थान झिंक, बजाज फायनान्स, होंडाई मोटर्स, टीसीएस या हेवीवेट शेअर्समध्ये घसरण झाली.
आज गाझा पट्टीतील हस्तक्षेपामुळे निर्णयाने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज दबाव हटल्याने कच्चे तेल स्वस्त झाले असताना जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर सोन्यातील व कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांवर दबाव कायम आहे. आजही सकाळच्या सत्रात सोन्यासह कमोडिटी बाजारात वाढ झाली आहे. युएस बाजारातील आगामी बेरोजगारीची आकडेवारी प्रतिक्षेत असल्याने गुंतवणूक दारांनी सावधगिरी बाळगली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच गुंतवणूकदारांचे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीबाबत जेरोमी पॉवेल यांच्या भाषणाकडे अथवा वक्तव्यांवर बारका ईने लक्ष असेल. काल कंसोलिडेशनमुळे युएस बाजारातही संमिश्रित कल आले होते. आशियाई बाजाराबाबत आशियाई बाजारांमध्ये संमिश्र ट्रेंड दिसून आले. जपानचा निक्केई २२५ ०.३३% घसर ला आणि टॉपिक्स ०.९२% घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.६६% ने वधारला. तथापि, कोस्डॅक ०.३७% घसरला आणि ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स/एस अँड पी २०० ०.२६% ने घसरला होता. आज बहुतांश आशियाई निर्देशांकात घसरण झाली आहे. वाढलेल्या कमोडिटी बाजारातील दबावासह आगामी युएसकडून होणाऱ्या अतिरिक्त टॅरिफ आकारणीचा दबाव निर्यातीत अपेक्षित आहे.
सकाळच्या सत्रावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' एकूणच बाजारातील वातावरण सकारा त्मक होत आहे. जागतिक पातळीवर, GAZA शांतता करारामुळे संघर्ष संपुष्टात येण्याचे आणि या प्रदेशातील भू-राजकीय जोखीम कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक पातळीवर, अमेरि का आणि भारत यांच्यात व्यापार कराराचे संकेत आहेत ज्यात भारताने तेल खरेदी 'पुनर्संतुलित' केली आहे. या सकारात्मक घडामोडी आणि FII धोरणातील बदल (गेल्या तीन व्यापार दिवसांत F II रोख बाजारात खरेदीदार होते) हे बाजारासाठी चांगले संकेत आहेत. जरी इतर बहुतेक बाजारपेठांच्या तुलनेत मूल्यांकन तुलनेने जास्त असले तरी, शॉर्ट-कव्हरिंग बाजाराला वर नेऊ शकते. बा जारात शॉर्ट पोझिशन उच्च असल्याने ही एक अत्यंत संभाव्य घटना आहे. चांगले महसूल आणि मार्जिन आकडे नोंदवणाऱ्या TCS कडून अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आयटी समभागांसाठी भावना उं चावू शकतात.
बाजारातील एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे प्राथमिक बाजारपेठेतील वाढलेला उत्साह. ११६०७ कोटी रुपयांचा LG इलेक्ट्रॉनिक्स IPO ५४ पट जास्त सबस्क्राइब होणे हे IPO बाजारातील उत्साहाचे प्र तिबिंब आहे. या आणि इतर IPO मधून परतफेड केल्याने बाजारातील तरलता वाढेल ज्यामुळे बाजाराला वर जाण्यास मदत होईल.'
सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल दुसऱ्या सहामाहीत वाढलेला ध क्का आठवड्याच्या उच्चांकाला पार करण्यात अपयशी ठरला असला तरी, त्यामुळे संध्याकाळच्या स्टार कॅन्डल स्टिक पॅटर्नच्या मंदीच्या पूर्वाग्रहाला रद्दबातल ठरले. हे आपल्याला येणाऱ्या दिवसां मध्ये २५४६० शोधण्यास प्रोत्साहित करते. दिवसासाठी, २५२१५ पातळीवर ढकलणे आणि तरंगणे अशक्य होणे किंवा २५११३ पातळीच्या पुढे थेट घसरणे, ट्रेंडला बाजूला करू शकते, परंतु लगेच २४९८२ पातळीचा ब्रेक घेण्याची आवश्यकता नाही.'






