Thursday, March 26, 2026

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंचा ओवैसी-पठाणांना 'चॅलेंज' तर उद्धव ठाकरेंना 'नैतिकते'वरून चिमटा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंचा ओवैसी-पठाणांना 'चॅलेंज' तर उद्धव ठाकरेंना 'नैतिकते'वरून चिमटा

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि नेते वारिस पठाण यांना थेट आव्हान दिले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच राणे यांनी यावेळी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या मोठ्या पॅकेजचा उल्लेख करत राणे म्हणाले, “ठाकरे गटाने या पॅकेजबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करायला हवा होता, पण ते नैतिकता दाखवणार नाहीत.”

राणे यांनी असाही चिमटा काढला की, हेच लोकं जाहीरपणे टीका करतात, पण नंतर काळ्या कपड्यांमध्ये सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे राहतात.

“एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे त्याच योजनेत गुपचूप रांगा लावायच्या, अशी दुटप्पी नीती ठाकरे गट दाखवत आहे,” असा आरोप राणे यांनी केला.

राणेंच्या या आक्रमक भूमिकेचे त्यांच्या समर्थकांनी 'हिंदुत्वाची बाजू निर्भीडपणे मांडणारा नेता' म्हणून कौतुक केले आहे.

Comments
Add Comment