
तिसरा डोळा उघडायला लावू नका! आय लव्ह मोहम्मद' बॅनरवरून राणे संतप्त
मुंबई : मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर तीव्र हल्लाबोल करत, थेट ‘पाकिस्तान’ आणि ‘शरीया’चा संदर्भ देत वादग्रस्त विधान करणाऱ्या ओवैसीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेत राणेंनी ओवैसींच्या भाषणावर प्रत्युत्तर देताना धार्मिक आणि राजकीय मुद्यांवरून जोरदार टीका केली. “हे काय पाकिस्तान आहे का? शरीया आहे का?” असा थेट सवाल राणेंनी केला.
नितेश राणे म्हणाले, “कालची सभा अहिल्यानगरमध्ये झाली, अहमदनगरमध्ये नाही. हे लोकं वळवळ करत इथे येत आहेत. कायदा सुव्यवस्था मानतो असं बोलतात, पण अहिल्यानगर नाव मानायचं नाही. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केलंय, तेही मानायचं नाही. हे काय पाकिस्तान आहे का? शरीया आहे का?” त्यांनी पुढे टीका करत म्हटलं, “ज्यांच्या विचारातून ही पिलावळ तयार झाली, ते भारताच्या स्वातंत्र्याच्या विरोधातच होते.”

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर स्वच्छ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी एक मोठी आणि कडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ...
‘हिरव्या सापांची वळवळ’ आणि सभांवर बंदीचा इशारा
ओवैसींच्या भाषणामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप करत राणे म्हणाले, “येथे हिरव्या सापांची वळवळ झाली. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. जर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न असेल, तर सरकारलाही विचार करावा लागेल की अशा सभा होऊ द्यायच्या की नाही.” ओवैसींच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी तिखट शब्दात टोला लगावला, “हे नसबंदीवाले पिलावळ आहे. भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. कोंढव्यात लागलेल्या ‘आय लव्ह मोहम्मद’ बॅनरवरूनही राणे संतप्त झाले. त्यांनी म्हटलं,“सगळीकडे ‘आय लव्ह मोहम्मद’ चे पोस्टर लावाल आणि धमकावत असाल, तर आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला लावायला देऊ नका. पैगंबर-कुराणावर बोललं तर वळवळतं, पण आमच्या देवींचे हात तोडता तेव्हा आम्ही गप्प बसायचं का?” त्यांनी पुढे आरोप केला की, “यांना शरीया आणायचा आहे, हे लोकं आंबेडकरांना मानत नाहीत. खरा सनातनी हिंदू तोच, जो शिवशक्ती आणि भीमशक्तीला मानतो.”