मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण सर्वच ओळखतो. सोशल मीडियावर तिचे हजारो चाहते असून आपले ग्लॅमरस फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हास्यजत्रेनंतर तिने मराठी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली नुकताच तिचा दशावतार हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यात तिने वंदू ही भूमिका साकारली होती. दशावतार निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपले काही अनुभव प्रेक्षकांना सांगितले. त्यातच तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या अविस्मरणीय अशा एका भयानक प्रसंगाबद्दल सांगितलं. यावेळी तिने 'जर उपचार मिळाले नसते तर मी संपले असते असंही म्हटलं.
पुण्याहून साताऱ्याकडे प्रवास करताना प्रियदर्शिनी इंदलकर आणि तिच्या आईचा भीषण अपघात झाला . वाळुंज गावाजवळ त्यांच्या गाडीने १५० किमी वेगात दुभाजकाला जोरदार धडक दिली . त्या वेळी प्रियदर्शिनी मागच्या सीटवर आडवी झोपलेली होती. धडकेच्या वेळी ती मधल्या पॅसेजमध्ये पडली आणि तिथल्या बंपमुळे तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. या धडकेत तिची स्प्लीन तुटली आणि आतून मोठा रक्तस्त्राव झाला.
सुरुवातीला प्रियदर्शिनीला फक्त हात आणि खांद्यास मार लागल्याचं दिसत होतं, त्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्या गंभीर अवस्थेत असलेल्या आईकडे होतं. अपघात झाला तेव्हा आईला कदाचित झोप लागली असावी. त्यानंतर तिथल्या लोकांनी आम्हाला जवळच्या एका हॉस्पिटल यामध्ये नेलं. या अपघातानंतर तिचे वडील चेन्नईहून तातडीने आले. त्यावेळी ते ज्या विमानाने आले त्याआधीचं विमान क्रॅश झालं होतं, त्यामुळे कुटुंबावर एकाच वेळी दुहेरी धक्का बसला होता. हॉस्पिटल मध्ये असताना सतत पोटदुखत होते म्हणून सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सांगितलं कि अवस्था नाजूक आहे. रक्तस्त्राव होत असल्याने HBS फक्त ३-४ इतके राहिले होते. त्यामुळे उपचार घेण्यासाठी जरा जरी उशीर झाला असता तर मी तशीच झोपेत संपले असते.
पुढे ती म्हणते सांगलीचे डॉ. जाधव यांनी ऑप्रेशन न करण्याचा सल्ला दिला आणि नुसत्या गोळ्यांवर शरीरातला रक्तस्त्राव थांबवला. आणि सुदैवाने माझ्या शरीराने हि याला उत्तम साथ दिली. अपघातात डाव्या हाताला लागले होते आणि त्त्याची खून अजूनही माझ्या हातावर आहे आणि ती मी तशीच ठेवली आहे. कारण ती खून सतत मला माझ्या पुनर्जन्माची आठवण करून देते.






