Thursday, October 9, 2025

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर उंच इमारतीवरून सिमेंट ब्लॉक पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, स्थानिकांनी धावाधाव करत महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र उंचीवरून वीट पडल्याने मोठा रक्तश्राव झाल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

येथील इमारतीचा बांधकाम सुरू होता, याच बांधकाम इमारतीमधून पांढऱ्या रंगाचा सिमेंट ब्लॉक पडून संस्कृतीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान, घटना कशामुळे घडली, यामध्ये चूक कोणाची आहे, या संदर्भात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत मुलीचे वडील अनिल उमेश अमिन यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Comments
Add Comment