Thursday, October 9, 2025

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली आहे, तारीख देताना त्यांनी आजची जी सुनावणी चालू होती ती सुनावणी होणार नाही म्हणून त्यांनी ती तारीख दिली आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाचा यापूर्वीचा पण निकाल आणि सर्वोच्च न्यायालयाने आज जी १२ नोव्हेंबरची तारीख दिली त्याकरता प्रसारमाध्यमांसमोर उबाठाचे काही लोकप्रतिनिधी व त्यांचे वकील ही खोटी माहिती लोकांसमोर सादर करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करून जी चुकीची माहिती ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांना देत आहेत ते फार चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिली आहे. ते बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आमच्यातर्फे ॲड. श्री मुकुल रोहतगी, ॲड. हरीश साळवे, ॲड. श्री नीरज किशन कौल, ॲड. मनिंदर सिंग आणि ॲड. मेहता शिवसेना पक्षातर्फे ही केस या ठिकाणी लढवत आहेत आणि ते सर्व वकील त्या ठिकाणी उपस्थित होते. उबाठाच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून कपिल सिब्बल हे त्या ठिकाणी रिप्रेजेंट करत आहेत या दोन्ही बाजूच्या वकिलांच्या संमतीने १२ नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली परंतु कुठेतरी न्यायमूर्तीनी या तारीख दिल्याबद्दल उबाठाच्या काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वक्तव्यातून केलाय आणि त्यांच्या वकिलांनी संशय व्यक्त केला ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

एकीकडे संविधानाचा सन्मान करावा अशी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे ज्या संविधानाने निवडणूक आयोगाला नेमलेला आहे आणि निवडणूक आयोग नियमानुसारच काम करताना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिले; त्याची महत्त्वाचं कारण म्हणजे जे मतदानाची जी संख्या आहे. कारण कुठल्याही पक्षाला चिन्ह किंवा पक्षाचे नाव हे त्याच्या मतदानाच्या वर आधारित असते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण आणि हा पक्ष राहील त्याचे महत्त्वाचा कारण त्यावेळची जी खासदारांची मतदारांची संख्या आणि त्यावेळीच्या आमदारांची मतदानाची संख्या; ते मतदान धरून त्यानुसार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला दिलाय, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम उबाठाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे.

कुठेतरी एक संशय येतोय की गेले तीन वर्ष धनुष्यबाण आणि शिवसेना या नावाने मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा मुंबईचा विकास केलाय ते चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेचे संस्थेच्या निवडणुकीत गोंधळाचा वातावरण निर्माण व्हावं. हा एक त्यामागे उबाठाचा एक षडयंत्र दिसून येत आहे, कारण माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली लोकसभेत पण यश प्राप्त झालेलं आणि विधानसभेत पण यश प्राप्त झालेले. लोकसभेत सात खासदार निवडून आलेले आहेत आणि विधानसभेत 60 आमदार निवडून आलेले आहेत. त्याबद्दल त्यांची मतदानाची जर संख्या बघाल तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे चिन्ह आणि पक्ष हा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहील असा आम्हाला विश्वास आहे, कारण आम्ही ज्या काही प्रोसिजर संपूर्ण केलेल्या आहेत ते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संविधानाच्या नुसार आणि कायद्याच्या चौकटीत बसूनच सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळेच माननीय निवडणूक आयोग असेल. माननीय सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे; तो संविधानानुसार आणि घटनेनुसारच दिलेला, त्यामुळे वारंवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी एक गोंधळाचे वातावरण निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून उभाटाचे वकील आणि उभाटाचे लोकप्रतिनिधी हे सर्वोच्च न्यायालयावर आरोप करून एक अत्यंत घाणेरड्या भाषेत माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या उल्लेख करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ते एक प्रकारे त्यांचा संविधानावरच विश्वास नाही. त्यांचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, हे मी तुम्हाला या पत्रकार परिषदेतून सांगतो, असेही शेवाळे म्हणाले.

Comments
Add Comment