Saturday, November 1, 2025
Happy Diwali

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन महत्त्वाच्या ठिकाणी शोरुम सुरू केले. मात्र शोरुममध्ये विक्रीस असणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत जास्त असल्यामुळे विक्री होण्यात अडचण येत आहे. त्यामुळे टेस्लाने आता जागतिक स्तरावर गाड्यांची किंमत कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई येथे जुलैमध्ये तर दिल्ली येथे ऑगस्टमध्ये टेस्लाने शोरुम सुरू केले. या दोन्ही शोरुममध्ये गाड्यांची विक्री कमी प्रमाणात झाल्याने टेस्लाला जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहन उद्योगात तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे टेस्लाने आता Model Y आणि Model 3 च्या किमतीमध्ये घट केली आहे. हे मॉडेल्स जागतिक स्तरावर सर्व देशांना परवडतील आणि पुन्हा उद्योगात उभं राहायला मदत होईल अशी आशा कंपनीला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मॉडेल वायची (स्टँडर्ड) किंमत ३९,९९० अमेरिकन डॉलर आणि मॉडेल थ्रीची (स्टँडर्ड) किंमत ३६,९९० अमेरिकन डॉलर इतकी आहे. तर भारतात मॉडेल वायची (स्टँडर्ड) किंमत ३५,४९,११२ आणि मॉडेल थ्रीची (स्टँडर्ड) किंमत ३२,८४,०४२ एवढी आहे. स्थानिक करांमुळे किमतींमध्ये थोड्या बदलाची शक्यता आहे.

Comments
Add Comment