प्रतिनिधी:देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने (Tata Consultancy Services Limited) आपला आर्थिक वर्ष २०२६ दुसरा तिमाही निकाल जाहीर केला आहे.युएस एच१बी व्हिसा निर्णयासह अतिरिक्त शुल्काच्या निर्णयानंतरही टीसीएसचा इयर ऑ न इयर बेसिसवर (YoY) कंसोलिडेटेड निव्वळ नफा १२०७५ कोटींवर पोहोचला आहे जो १.४% वाढला. मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत कंपनीच्या या नफ्यात १.४% वाढ झाली आहे. याशिवाय टीसीएसच्या संचालक मंडळाने (Board of Directors) कडून दुसरा अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर झाला आहे. लाभार्थ्यांना ११ रूपये प्रति शेअर लाभांश मिळेल असा प्रस्ताव टीसीएसने पारित केला. यासाठी १५ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख घोषित करण्यात आली असून ४ नोव्हेंबरला लाभांश पात्र भागभांड वलधारकांना मिळणार असल्याचे बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्येही ७० बेसिस पूर्णांकाने वाढ झाली असल्याने २५.२% वर पोहोचला असल्याचे कंपनीने निकालात स्पष्ट केले. कंपनीच्या निव्वळ मार्जिनमध्येही (Net Margin) मध्येही फायदा झाला असून ते १९.६% वर पोहोचले आहे. कंपनीच्या कंसोलिडेटेड (एकत्रित) कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर २.४% वाढ झाली. मागील दुसऱ्या तिमाहीत ते ६४७९९ कोटी होते ते यंदा ६५७९९९ कोटी रूपये झाले आहे. लाभांश जाहीर करताना कंप नीने म्हटले आहे की प्रत्येकी १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या इक्विटी शेअरमागे ११ रुपयांचा अंतरिम लाभांश मिळेल.
जागतिक महसूलाबाबत बोलताना कंपनीने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय महसूल स्थिर चलनाच्या बाबतीत तिमाहीत ०.६% वाढ ला. उत्तर अमेरिकन बाजारपेठेत तिमाहीत वाढ झाली परंतु वार्षिक उत्पन्नात घट झाली.दरम्यान भारतातील व्यवसायातही वार्षिक उ त्पन्नाच्या आधारावर मोठी घसरण दिसून आली.
कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकालावर भाष्य करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतिवासन म्हणाले आहेत की, 'आमच्या दुसऱ्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि उत्कृष्टतेबद्दल आभार मानू इच्छितो. आम्ही जगातील सर्वात मोठी एआय-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्याच्या प्रवासावर आहोत. आमचा प्रवास प्रतिभा, पायाभूत सुविधा, इकोसिस्टम भागीदारी आणि ग्राहक मूल्य यामधील धाडसी परिवर्तनात गुंतलेला आहे. जागतिक दर्जाच्या एआय पायाभूत सुविधा व्यवसायाच्या उभारणीसह गुंतवणूक, या परिवर्तनासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.'
अखेरच्या सत्रात आज टीसीएस शेअर १.०९% उसळत ३०६०.२० रुपयांवर बंद झाला होता. त्यामुळे उद्याच्या सत्रात टीसीएसमधील हालचाल गुंतवणूकदारांसाठी महत्वाची ठरणार आहे. विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून कंपनीकडून सातत्याने झालेल्या कर्मचा री कपातीनंतर आता लाभांश जाहीर केल्याने गुंतवणूकदारांना नवी दिशा या निमित्ताने मिळणार आहे.