Thursday, October 9, 2025

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

यामध्ये उद्योग निरीक्षकासाठी ९ जागा, तांत्रिक सहायकासाठी ४ जागा, कर सहायकासाठी ७३ जागा तर लिपिक टंकलेखकासाठी ८५२ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या पदासठी उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता गरजेची आहे.

सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असावी. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तिर्ण मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment