थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल


माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून निर्माण झालेल्या या सिनेमाने रसिक प्रेक्षक, मान्यवर आणि समीक्षक अशा तिघांची प्रचंड पसंती मिळवली. सर्वजण सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल भरभरून लिहू लागले. माऊथ पब्लिसिटीने चित्रपट जोर धरत असतानाच कांतारा हा चित्रपट आला आणि चांगला चालत असलेला कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा सर्वच थिएटर मधून काढण्यात आला. आता फक्त मूव्हीटाईम हब या गोरेगाव मधील थिएटरमध्ये या चित्रपटाचा एक शो आहे, जो सुद्धा प्रत्येक दिवशी हाउसफुल चालला आहे. बॉलीवूड आणि साउथच्या चित्रपटांसमोर मराठी चित्रपटांना मिळणारं दुय्यम स्थान हा काही नवीन विषय नाही. यावर चर्चा होतात, पण ठोस पावलं उचलली जात नाहीत.
"कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटाबाबतीतही असेच झाले पण कोणत्याही पाठबळाशिवाय या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात सुद्धा प्रेक्षक खेचून आणला. थिएटर नाहीत तरी वेंगुर्लेकरांनी वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात या चित्रपटाचे दोन शो लावले आणि दोन्ही शो हाउसफुल झाले आणि अजून शोजची मागणी आहे. निर्मात्यांना प्रेक्षकांच्या मागणीनुसार एका दिवसात चार शो लावावे लागले आणि काही मिनिटातच हे चारही शो हाऊसफुल झाले. रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा ते चांगले नसतात अशी बोंबाबोंब करणाऱ्यांना लेखक अमरजीत आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर यांनी "अ' दर्जाचे उत्तर दिले आहे. पण राजाश्रय नसल्याकारणाने लोकचळवळीतून तयार झालेला हा सिनेमा सर्व दूर पोहोचत नाही आहे जी आत्ताची गरज आहे.
वैभव मांगले, सुनील तावडे, वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, साईंकीत कामत, स्वानंदी टिकेकर अशी तगडी स्टारकास्ट घेऊन बनवल्या गेलेल्या या अप्रतिम चित्रपटाला आता खऱ्या अर्थाने लोकाश्रयाची गरज आहे. ग्लोबल कोकण, मराठी एकीकरण समिती, शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटना अशा संघटनांनी एकत्रितपणे या चित्रपटामागे उभे राहायचे ठरवले आहे. मराठी राज्यकर्त्यांनी सुद्धा खरंतर 'कुर्ला टू वेंगुर्ला' या अस्सल महाराष्ट्राच्या मातीतल्या चित्रपटामागे उभे राहण्याची आता खरी गरज आहे.

Comments
Add Comment

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या