
क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार
प्रतिनिधी:जवळजवळ चार वर्षांपूर्वी देशात जावा आणि येझदी या प्रतिष्ठित मोटारसायकली ब्रँड पुन्हा लाँच करणाऱ्या क्लासिक लेजेंड्सने बुधवारी सांगितले की, २८% वरून ८% पर्यंत झालेल्या जीएसटी दर कपातीचा फायदे पूर्णपणे ग्राहकांना पास करण्यात आ ले आहेत. त्यामुळे आता या दुचाकीमध्ये मोठी दरकपात झाल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, २२ सप्टेंबरपासून जीएसटी दर सुसूत्रीकरण लागू झाल्यामुळे, ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटारसायकलीं च्या खरेदीदारांनाही हे फायदे देण्यात आले आहेत. महिंद्रा समूहाच्या पाठिंब्याने क्लासिक लेजेंड्सने शहरात येझदी मोटारसायकलींचा एक प्रकार देखील लाँच केला आहे.
कंपनीने देशभरात त्यांची विक्री आणि सेवांचा विस्तार ४५० हून अधिक केंद्रांवर केला आहे. प्रीमियम मोटारसायकली विभागात अधिक विक्री मिळविण्याची क्लासिक लेजेंड्सची योजना आहे.कंपनीने या व्यापक उपस्थितीचा आणि अनुकूल किंमतीचा फायदा घेऊन प्रीमियम मोटरसायकल विभागात विक्री वाढवण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये रेट्रो डिझाइन आणि आधुनिक कामगिरीचे मिश्रण शोधणाऱ्या तरुण आणि महत्त्वाकांक्षी रायडर्सना लक्ष्य केले आहे.