Wednesday, October 8, 2025

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यातच उमेदवार म्हणून मिथिलामधून मैथिली ठाकूर हे नवीन नाव समोर येत आहे.मैथिलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषीयी असलेला आदर आणि प्रेम यावर भाष्य केले. मोदी तिचे आवडते नेते असल्याचे तिने सांगितले. तिला राजकारणाची अजिबात आवड नव्हती पण जेव्हापासून ती नरेंद्र मोदींचे भाषण ऐकू लागली तेव्हापासून तिला राजकारणात आवड निर्माण झाली असे ती म्हणाली.

अयोध्येच्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेवेळी मैथिली आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. मैथिली ही उत्तम गायक आहे. तिच्या भजनांची प्रशंसा नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केली होती. त्यावेळी त्यांनी एक्स पोस्ट करत देशवासियांना तिचे भजन ऐकण्याचे आवाहनही केले होते. याशिवाय ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तिला "नॅशनल क्रीएटर्स अवॉर्ड" आणि "कल्चर अँबेसिडर ऑफ द ईयर" ने सन्मानित करण्यात आले. मैथिलीने त्यावेळी पंतप्रधान मोदींसमोर शंकराचे भजन ऐकवले होते

मैथिली ठाकूरचे वडील रमेश ठाकूर हे संगीतकार असल्याने लहानपणापासून गायनाचे संस्कार तिच्यावर झाले. बिहार मधील भोजपुरी सारख्या मूळ भाषेतील लोकगीत, छट गीत, कजरी आणि पारंपरिक भजने, मैथिली गाते.. मैथिलीचे इन्स्टा फॉलोअर लाखोंच्या घरात आहेत.

मैथिली ठाकूर ब्राह्मण समाजातील आहे. मिथिलेत ब्राह्मण मतदारांची मोठी संख्या आहे. यात भाजपला मतदान करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. या मतदारांचा पाठिंबा मिळावा आणि उमेदवार विजयी व्हावा या हेतूने भाजप मिथीलैतून मैथिलीला उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी मैथिलीशी चर्चा केली.

Comments
Add Comment