Wednesday, October 8, 2025

RBI FX Retail Bharat Connect Linkage: आता एका अँपमधील क्लिकवर रूपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर खरेदी करणे शक्य आरबीआयचे मोठे पाऊल!

RBI FX Retail Bharat Connect Linkage: आता एका अँपमधील क्लिकवर रूपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर खरेदी करणे शक्य आरबीआयचे मोठे पाऊल!

प्रतिनिधी:एफएक्स-रिटेल-भारत कनेक्ट लिंकेजमुळे सहभागी बँकांमध्ये बँक खाते असलेल्या वैयक्तिक ग्राहकांना सहभागी बँकांच्या डिजिटल चॅनेलद्वारे आणि थर्ड पार्टी अँपप्लिकेशन प्रोव्हायडर्स (टीपीएपी) द्वारे एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्मवर नोंदणी आणि व्यव हार सुलभपणे करता येणार आहेत. बँक ग्राहक आता 'व्हॅल्यू कॅश' आधारावर भारतीय रुपयांविरुद्ध अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी क्रेड (CRED) आणि मोबिक्विक अँप्लिकेशन्सद्वारे एफएक्स- रिटेलमध्ये प्रवेश करत व्यवहार करू शकणार आहेत. सहभा गी बँका अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक आहेत. या बँकेच्या ग्राहकांना आता हे व्यवहार सहजतेने करता येतील.उपलब्ध माहितीनुसार, आरबीआयने क्लियरकॉर्प डीलिंग सिस्टम्स (इंडिया) लिमिटेड च्या एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्मला भारत बिल पेमेंट सिस्टम (भारत कनेक्ट) शी जोडले आहे.

याविषयी नेमके बोलताना,'क्लियरकॉर्प डीलिंग सिस्टम्स (इंडिया) लिमिटेड (क्लियरकॉर्प) च्या एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्मला भारत बिल पेमेंट सिस्टम (भारत कनेक्ट) शी जोडले गेले आहे' असे आरबीआयने आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

एफएक्स-रिटेल म्हणजे काय?

क्लियरकॉर्पद्वारे चालवले जाणारे एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्म २०१९ मध्ये "त्यांच्या वापरकर्त्यांसाठी परकीय चलनाच्या किंमतीमध्ये अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता" आणण्यासाठी लाँच करण्यात आले.

'एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्मची पोहोच वाढवण्यासाठी, वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि मोठ्या संख्येने ग्राहकांना पारदर्शकपणे आणि निष्पक्षतेने एफएक्स मार्केटमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करण्यासाठी, ०६ डिसेंबर २०२४ रोजीच्या विकासात्मक आ णि नियामक धोरणांवरील विधानात घोषणा करण्यात आली होती की, एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्म एनबीबीएलद्वारे संचालित भारत कनेक्टशी जोडला जाईल, ज्याची सुरुवात टप्प्याटप्प्याने पायलट पद्धतीने केली जाईल ज्याद्वारे वैयक्तिक ग्राहकांना भारतीय रुपयां च्या तुलनेत अमेरिकन डॉलर्स खरेदी करता येणार' असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

ग्राहक एफएक्स-रिटेल कसे अँक्सेस करू शकतात?

बँकांचे ग्राहक CRED आणि Mobikwik अँप्लिकेशनद्वारे FX-रिटेल अँक्सेस करू शकतील.

एफएक्स-रिटेल आणि भारत कनेक्ट लिंकेज ग्राहकांना कशी मदत करेल?

सहभागी बँकांमध्ये बँक खाते असलेल्या वैयक्तिक ग्राहकांना सहभागी बँकांच्या सक्षम डिजिटल चॅनेलद्वारे आणि थर्ड पार्टी अँप्लिकेशन प्रोव्हायडर्स (TPRP) द्वारे एफएक्स-रिटेल प्लॅटफॉर्मवर नोंदणी आणि व्यवहार करता येतील. शिवाय, एफएक्स-रिटेलच्या वि द्यमान ग्राहकांसाठी, लिंकेज प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याचा आणखी एक पर्याय प्रदान करेल.

एफएक्स-रिटेल आणि भारत कनेक्ट लिंकेज कोणत्या उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते?

'मूल्य रोख' (Value Cash) आधारावर भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी नवीन सुविधेचा वापर करू शकतात:

१) परकीय चलन बाह्य रेमिटन्स -परकीय चलन कार्ड लोड करणे तसेच संबंधित सहभागी बँकांनी देऊ केलेल्या परकीय चलन नोटांचे भौतिक वितरण (Physical Distribution) असे आरबीआयने म्हटले होते. याशिवाय फेडरल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडि याचे ग्राहक या बँकांच्या इंटरनेट बँकिंगद्वारे एफएक्स-रिटेलमध्ये देखील प्रवेश करू शकतात असेही आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >