मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्रांमधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम नियोजनानुसार मंगळवार ०७ ऑक्टोबर , बुधवार ०८ ऑक्टोबर व गुरुवार ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.३० वाजेपर्यंत म्हणजेच अडीच तास केले जाणार होते. त्यापैकी मंगळवार व बुधवारी नियोजित कामकाज सफलतापूर्वक पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, गुरुवार ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे हे कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.


त्यामुळे मुंबई शहर विभागातील ए , बी , एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील व पूर्व उपनगरातील एल विभाग (कुर्ला पूर्व ), एन विभागात, विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रातील यापूर्वी प्रस्तावित केलेली १० टक्के पाणीकपात रद्द करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याचे जलअभियंता विभागाने जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट

मुंबई : बदलापूर (जि. ठाणे) येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेचं