Tuesday, November 18, 2025

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २००८ च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. शिवसेना-उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे नुकतीच निर्णायक बैठक झाल्याची माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी दिली. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००४ पासून ‘जुनी पेन्शन’ योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना चालू केली होती. त्याच धर्तीवर प्रथम राज्य शासनाने व नंतर मुंबई महापालिकेने अनुक्रमे १ नोव्हेंबर २००५ व ५ मे २००८ पासून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
Comments
Add Comment