लालबागचा राजा मंडळाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ५० लाखांची मदत

मुंबई:लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५० लाखाचा चेक राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा चेक सुपूर्द केला. यावेळी लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यात आलेल्या पूरामध्ये तेथील शेतकऱ्याचे जनजीवन उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मदतीसाठी लालबागचा राजा मंडळ धावून आले आहे. याआधीही अनेक संस्थानांनीही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्य सरकारनेही मंगळवारी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. हाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिकांसह, घरे आणि जमिनींचेही अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आज बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे.
Comments
Add Comment

मुंबई मेट्रो मार्गिका-३च्या अंतिम टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड चालणार मेट्रो

मुंबई: पंतप्रधान मोदी आजच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रो मार्गिका-३ (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचे (टप्पा-२बी, आचार्य

मुंबईच्या लोकसंख्येने ओलांडला १ कोटी ३० लाखांचा टप्पा, एका वर्षात ४६ हजारांची पडली भर

मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या २०२५मध्ये १

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन

लंडनस्थित झहा अदीद या वास्तूविशारद कंपनीने केलंय डिझाइन नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे

येत्या चार वर्षात मुंबई चित्रपट नगरीचा कायापालट करणार - मुख्यमंत्री

मुंबई : मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून

येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची ठरली रणनिती, या मतदारांवर केंद्रबिंदू...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनात शिवसेनेने आपली रणनिती

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बुधवारी सुनावणी

मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटात धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर उद्या,