Wednesday, October 8, 2025

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम जनरेटेड नोटीसवर आता क्यू आर कोड असणार आहे. गेल्या काही काळात देशभरात असे तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला होता. त्यांनी अनेक लोकांना करोडो रूपयांचा गंडा घातला होता. हाऊस अरेस्टचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यानंतर खुद्द पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांना याबाबत आवाहन करावे लागले होते.

सक्तवसूली संचलनालयाने आपल्या अधिकाऱ्यांना ईडीची सिस्टम जनरेटेड नोटीस ही अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत द्यावी, असे निर्देश दिले आहेत. ही सिस्टम जनरेटेड नोटीस ही व्यवस्थित सही शिक्क्यासह असली पाहिजे, त्यावर संपर्कासाठी त्या अधिकाऱ्याचा इमेल आयडी आणि फोन नंबर देखील असला पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत.

पीएमएलए अॅक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या तसेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटीसवर आता क्यू आर असणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक ईडीने प्रसिद्ध केले आहे. यात ज्याला ईडीची नोटीस आली आहे. तो ही नोटीस खरी आहे की खोटी याची पडताळणी त्या नोटीसवर असणारा क्यू आर कोड स्कॅन करून करू शकतात. ज्यावेळी हा क्यू आर कोड स्कॅन करण्यात येईल, त्यावेळी तो संबधित व्यक्तीला ईडीच्या पोर्टलवर घेऊन जाईल. तिथे नोटीसमधील डिटेल पाहता येतील. यासाठी नोटीसवरील पासवर्डचा वापर करून हे डिटेल पाहता येतील.

Comments
Add Comment