Thursday, October 30, 2025
Happy Diwali

सरकारी रुग्णवाहिका नावालाच, महिलेची भर रस्त्यात प्रसूती

सरकारी रुग्णवाहिका नावालाच, महिलेची भर रस्त्यात प्रसूती

वावी हर्ष येथील घटना; आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास

नाशिक : दोन तासापासून कॉल करून रुग्णवाहिका न आल्याने गरोदर मातेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथे बुधवारी घडली आहे. कॉल करूनही वाहन उपलब्ध करून न देणाऱ्या यंत्रणेचा जाहीर निषेध केला जात असून आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मातेला आणि बाळाला शासनाने मोफत अॅम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून दिली मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होतच नसल्याने भर रस्त्यात डिलिव्हरी ची वेळ आली होती. सुदैवाने खाजगी वाहनाने महिलेला रुग्णालयात नेले जात असतानाच वाहनातच तिची डिलिव्हरी सुखरुप झाली. या प्रकाराने सरकारी रुग्णवाहिका चा प्रश्न आणि कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्षेतील एका महिलेला सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने सकाळी सहा वाजेपासून सदर महिला १०२, १०८ वर कॉल करून अॅम्बुलन्स ची मागणी करत होती मात्र त्यांना अनेक कारणे सांगून अॅम्बुलन्स देण्यास नकार दिला. शेवटी त्या मातेला खाजगी वाहनातून त्र्यंबकेश्वर येथे डिलिव्हर साठी देत असताना पहिने गावा जवळ खाजगी वाहनामध्ये डिलिव्हरी झाली. सुदैवाने तिची डिलिव्हरी सुखरूप झाली.

Comments
Add Comment