गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्धविरामावरून हमासला शेवटचा इशारा दिला आहे. जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव नाकारला तर त्यांची पूर्णपणे धुळधाण उडवली जाईल, अशी सक्त ताकीद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील शांततेच्या योजनेचा स्वीकार करण्यासाठी हमासला रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर आता ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.


डोनाल्ड ट्रम्प, हमासला इशारा देताना म्हणाले की, जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव स्वीकार करण्यास नकार दिला, तर त्यांना पूर्णपणे नष्ट केलं जाईल. यावेळी बेंजामिन नेतन्याहू यांचा गाझामधील बॉम्बवर्षाव थांबवण्यास आणि अमेरिकेच्या शांतता प्रस्तावास पाठिंबा आहे का? असं विचारलं असता डोनाल्ड ट्रम्प यांनी होकारार्थी उत्तर दिलं. तसेच हमास खरोखरच शांततेसाठी कटिबद्ध आहे का, हे लवकरच आपल्याला समजेल असेही त्यांनी सांगितले.


डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या २० सूत्री शांतता प्रस्तावामधून गाझामधील सध्याचा संघर्ष थांबवण्यासोबत गाझातील युद्धोत्तर प्रशासनाचे एक स्ट्रक्चर तयार केलं आहे. एवढंच नाही तर ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव हा गझामधील संघर्ष संपवण्यासाठी आणि भविष्यातील प्रशासनासाठीची ब्लू प्रिंट असल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी गाझामधील संघर्ष अद्याप थांबलेला नसल्याचे सांगितले. हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करून घेणं हा केवळ पहिला टप्पा आहे, तसेच पुढील व्यवस्थेवर अजूनही काम सुरू आहे, असे सांगितले. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर हमास काय भूमिका घेणार, याची जगभरात चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

भारताचा ‘ध्वनी’ ब्रह्मोसपेक्षाही महाभयंकर?

नवी दिल्ली : भारताने ब्रह्मोसपेक्षाही ‘महाभयंकर’ क्षेपणास्त्र तयार केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे नवे तळही थेट

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर