Tuesday, October 7, 2025

Stock Market: सलग चौथ्यांदा शेअर बाजारात वाढ, मिड कॅप शेअर्सने बाजाराला तरले तर उर्वरित एफएमसीजी, पीएसयु बँक, मिडिया निर्देशांकाने घालवले !

Stock Market: सलग चौथ्यांदा शेअर बाजारात वाढ, मिड कॅप शेअर्सने बाजाराला तरले तर उर्वरित एफएमसीजी, पीएसयु बँक, मिडिया निर्देशांकाने घालवले !

मोहित सोमण:अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १३८.५९ अंकाने उसळत ८१९२८.७१ पातळीवर व निफ्टी ३०.६५ अंकाने उसळत २५१०८.३० पातळीवर स्थिरावला आहे. सलग चौथ्यांदा ही वाढ झाल्याने बाजाराला गती प्रा प्त झाली. फोकस मिडकॅप, फार्मा, मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम या निर्देशांकातील झालेल्या वाढीचा अंतिम परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. जागतिक अस्थिरतेतही भारतीय बाजार आज हिरव्या रंगात बंद होण्यास यशस्वी ठरले. तरीही शेअर बाजारात सकाळी १% हून अधिक प्रमाणात उसळलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा केवळ १% घसरल्याने मजबूत रॅली झाली नाही. विशेषतः आयटी मिड कॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे आज बाजाराला स पोर्ट लेवल मिळाली असली तरी एफएमसीजी, मिडिया, पीएसयु बँक निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे ही रॅली मर्यादित राहिली.

आज बड्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, भारती एअरटेल अशा शेअर्समध्ये आपली गुंतवणूक कायम राखताना या स्क्रिप खरेदीकडे आपला कल ठेवल्याने बाजारातील उत्सुकता झळकली आहे. आगामी टीसीएस (TCS) शेअ र्समध्ये होणारी हालचाल ग्राहकांना आयटी शेअर्समध्ये भविष्याकालीन मोजमापासाठी महत्वाची ठरेल. टीसीएसची लवकरच आपला तिमाही निकाल जाहीर करणार आहे. या धर्तीवर ही उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे एफएमसीजी शेअर्समध्ये सेल ऑफ सुरू असल्याने बाजार उत्तरार्धात मर्यादित यादीकडे ढकलला गेला.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आरएचआय मॅग्नेस्टा (१०.८५%), वोडाफोन आयडिया (८.३८%), बीएलएस इंटरनॅशनल (६.०८%), भारती हेक्साकॉम (५.८९%), इंद्रप्रस्थ गॅस (५.८०%), अनंत राज (४.३४%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (४.१३%), ब्रिगेड एंटरप्राईजेस ( ३.६५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.२३%) समभागात झाली आहे. तर अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (७.४६%), हॅपी माईंड (४.९४%), जीएमडीसी (४.३८%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.८९%), हिताची एनर्जी (३.६०%), दिपक नायट्रेट (२ .२७%), अँक्सिस बँक (२.१४%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.०६%), टाटा मोटर्स (२.०५%), ट्रेंट (१.१४%), गोदरेज इंडस्ट्रीज (१.२१%), बँक ऑफ बडोदा (१.७८%), ज्यूब्लिंएट फूडस (१.५२%) समभागात झाली आहे.आज शेअर बाजारात वाढ झाली असली तरी बी एसईतील ४३१५ समभागापैकी १८२० समभागात वाढ तर २३५६ समभागात घसरण झाली आहे. तर एनएसईतील ३१८४ समभागापैकी १४३४ समभागात वाढ तर १६३५ समभागात घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा 'कंसोलिडेशन' फेजची शक्यताही नि र्माण झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांनी सलग चौथ्या सत्रात त्यांची विजयी मालिका वाढवली,बेंचमार्क निफ्टी स्थिरपणे उघडला आणि 0.43% वाढीसह बंद झा ला (वेळ 2:22 PM). तेल आणि वायू, वित्तीय सेवा, बँकिंग, बांधकाम आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये खरेदीचा उत्साह लक्षणीयरीत्या मजबूत होता, ज्यामुळे क्षेत्रीय वाढ झाली. उलटपक्षी,मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू आणि निवडक समभागांमध्ये कमकुवतपणा का यम राहिला, ज्यामुळे त्यांना दिवसाचे पिछाडीवर असल्याचे चिन्हांकित केले. जागतिक आघाडीवर, सोमवारी अमेरिकन सिनेटने सरकारला निधी देण्याचे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही प्रस्ताव पुन्हा एकदा नाकारल्यानंतर अनिश्चितता निर्माण झाली,ज्यामुळे शटडाऊन सहाव्या दिवशीही लांबला आणि गुंतवणूकदारांची सावधगिरी वाढली.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने २५५०० पातळीवर प्रमुख प्रतिकार निश्चितपणे तोडला, ज्यामुळे २५५०० पातळीच्या दिशेने मार्ग मोकळा झाला, तर तात्काळ आधार २५००० पातळीवर राहिला. त्याचप्रमाणे, बँक निफ्टीला ५६५०० पातळीवर प्रतिकाराचा (Resista n ce) सामना करावा लागत आहे आणि या पातळीपेक्षा वर ब्रेकआउट झाल्यास तो ५७००० पातळीवर पोहोचू शकतो, ज्याचा जवळचा आधार ५६२०० पातळीवर आहे.डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, एकूण अँडव्हान्स-डिकलाइन रेशोने तेजीचा पक्षपात दर्शविला. IGL, UNOMINDA, CAMS, POWERINDIA आणि KAYNES मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्ड-अप दिसून आला, जो या काउंटरमध्ये सक्रिय लॉन्ग पोझिशन्स दर्शवितो.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सलग तीन आत्मविश्वासपूर्ण बंद झाल्यानंतर, मंगळवारीच्या सत्रात निफ्टीला त्याच्या २५२००-२५२५० पात ळीच्या प्रतिकार क्षेत्राजवळ विक्रीचा दबाव आला, ज्यामुळे असे दिसून आले की तेजी थांबू शकते, ज्यामुळे अल्पकालीन एकत्रीकरण होण्याची शक्यता आहे. तथापि, जोपर्यंत निर्देशांक २४९०० पातळीच्या वर टिकतो, जिथे त्याचा ५०-दिवसांचा ईएमए (Exponen tial Moving Average EMA) ठेवला जातो, तोपर्यंत दृष्टिकोन सकारात्मक राहतो. डेरिव्हेटिव्ह्जच्या बाबतीत, कॉल आणि पुट रायटर्स दोन्ही सक्रिय होते, २५००० पुट आणि २५२०० कॉल स्ट्राइकवर लक्षणीय OI जोडण्यांसह. म्हणूनच, निफ्टी २४९५०-२५३०० पातळीच्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये २४९५०-२५००० पातळीवर समर्थन आणि २५२५०-२५३०० वर प्रतिकार असेल'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >