अकोले येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.


अकोले येथे सध्या ‍दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तरची दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अकोले येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. या न्यायालयासाठी २१ नियमित पदे मंजूर करण्यात आले आहेत व चार पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वेतन व वेतनेत्तर, तसेच अन्य खर्चासाठी २ कोटी ७९ लाख ३५ हजार ९३४ रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
Comments
Add Comment

एका नरभक्षक बिबट्याचा शेवट; दुसऱ्या बिबट्यालाही ठार करण्याची परवानगी

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दहशत माजवणाऱ्या व दोन जिवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आले.

तृप्ती देसाईंचे इंदुरीकर महाराजांना ओपन चॅलेंज

अहिल्यानगर : लग्नासाठी कर्ज काढून मोठा खर्च करणे टाळा, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून नागरिकांना केले

संगमनेरमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर मोठी कारवाई

कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच, आज

दिवाळीनिमित्त साईबाबांना पाच कोटींच्या अलंकारांनी सजवले

शिर्डी : दिवाळीनिमित्त शिर्डीत साईबाबांच्या मूर्तीला साई संस्थानच्या वतीने पाच कोटी रुपये किंमतीच्या

अमित शाहांनी घेतले साईसमाधीचे दर्शन

शिर्डी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा समाधी मंदिराला भेट

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी