
स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच जपानचे शिमोन साकागुची या तीन वैज्ञानिकांना मिळाला आहे. या तिघांना पेरीफेरल इम्यून टॉलरन्स (Peripheral Immune Tolerance) या विषयावरील संशोधनासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
त्यांच्या पेरीफेरल इम्यून टॉलरन्सवरील संशोधनामुळे कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारात नवे दार उघडले आहे. त्यांच्या या शोधामुळे शरिराची इम्युन सिस्टिम समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरली आहे. यामुळे रुमेटाईड आर्थराटिस, टाइप १ प्रकारचा डायबेटीस व ल्यूपस सारख्या रोगांसाठी सुलभरित्या उपचार करता येतील. तसेच प्रतिरक्षा प्रणालीतील “रेग्युलेटरी T-कोशिका (Regulatory T cells)” या प्रकारच्या कोशिकांचा शोध आणि त्यांचे कार्य समजून घेणे यामुळे, ऑटोइम्युन रोग (immune system च्या चुकीच्या प्रतिक्रिया) या आजारांवर उपचारांच्या दिशेने वाट उघडण्यास मदत होईल. असे नोबेल समितीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे.
पुरस्काराची घोषणा काल ६ ऑक्टोबर २०२५ रोजी स्टॉकहोममधील कारोलिंस्का इंस्टिट्यूटने केली आहे. या पुरस्काराची रक्कम ११ दशलक्ष स्वीडिश क्रोन (SEK) इतकी आहे ती विजेत्यांमध्ये विभागून दिली जाईल.